esakal | मुंबईत कोव्हिडचा मृत्यूर 4.6 टक्क्यांवर; 20 ऑगस्ट ते 20 सप्टेंबरमध्ये 2.2 टक्के नोंद
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत कोव्हिडचा मृत्यूर 4.6 टक्क्यांवर; 20 ऑगस्ट ते 20 सप्टेंबरमध्ये 2.2 टक्के नोंद

महिन्याभरात कोव्हिडचा मृत्यूदर 5.4 टक्क्यांवरून 4.6 टक्क्यांवर आला आहे. तर, 20 ऑगस्ट ते 20 सप्टेंबर या काळात मृत्यूदर 2.2 टक्के नोंदविण्यात आला आहे, असा दावा मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी केला

मुंबईत कोव्हिडचा मृत्यूर 4.6 टक्क्यांवर; 20 ऑगस्ट ते 20 सप्टेंबरमध्ये 2.2 टक्के नोंद

sakal_logo
By
मिलिंद तांबे


मुंबई : महिन्याभरात कोव्हिडचा मृत्यूदर 5.4 टक्क्यांवरून 4.6 टक्क्यांवर आला आहे. तर, 20 ऑगस्ट ते 20 सप्टेंबर या काळात मृत्यूदर 2.2 टक्के नोंदविण्यात आला आहे, असा दावा मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी केला. 

माणकोली उड्डाणपुलाची मार्गिका वाहनांसाठी खुली; मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

मुंबईत 20 ऑगस्ट रोजी कोव्हिडच्या 1 लाख 28 हजार 892 रुग्णांची नोंद झाली होती, तर 6 हजार 990 जणांचा मृत्यू झाला होता. 20 सप्टेंबर रोजी 1 लाख 84 हजार 313 रुग्णांची नोंद झाली असून, 8 हजार 466 जणांचा मृत्यू झाला आहे. ऑगस्ट 20 रोजी मुंबईतील कोव्हिड मृत्यूदर 5.4 टक्के होता तो 4.6 टक्के झाला आहे.

खासगीत पॉझिटिव्ह अन सरकारी रुग्णालयात निगेटिव्ह; विश्वास कोणत्या अहवालावर ठेवायचा? रुग्णासमोर प्रश्न

चाचण्यांमध्ये वाढ केल्याने मुंबईत कोव्हिडचे रुग्ण वाढले आहे. मात्र, आजही कोव्हिड रुग्णांसाठी राखीव असलेले 4777 बेड्स रिक्त असून, 217 आयसीयू बेड्सही रिक्त आहेत. त्याचबरोबर रुग्णांना अधिक चांगले उपचार मिळण्यासाठी खासगी रुग्णालयांची मदत घेतली आहे. खासगी रुग्णालयांमधील 35 डॉक्टर जम्बो कोव्हिड केंद्रांसाठी मार्गदर्शन करत आहेत.

पॉझिटिव्हचे प्रमाण 18 टक्के 
मुंबईत रुग्ण वाढत असल्याने पूर्वीच्या तुलनेने पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण निम्मे झाले आहे. महिनाभरापूर्वी चाचण्या झालेल्यांपैकी 35 टक्के रुग्ण पॉझिटिव्ह आढळत होते. हे प्रमाण 18 टक्क्यांवर आले आहे, असा दावा पालिकेच्या एका अधिकाऱ्याने केला आहे.

मृत्यूबाबत दर आठवड्याला आढावा घेतला जात आहे. त्यामुळे मृत्यूदर कमी करण्यात यश आले आहे. पुढील महिन्याभरात हा मृत्यूदर अधिक कमी करण्याचा प्रयत्न आहे.
- इक्बाल सिंह चहल,
आयुक्त, मुंबई महापालिका 

एका महिन्यात झालेली नोंद
                         20 ऑगस्ट           20 सप्टेंबर
रुग्णांची नोंद       1,28,892           1,84,313
मृत्यूची नोंद             6,990                 8,466
मृत्यू दर                     5.4                     4.6

----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )