esakal | अखेर ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणातला गोंधळ होणार दूर, कसा तो जाणून घ्या
sakal

बोलून बातमी शोधा

अखेर ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणातला गोंधळ होणार दूर, कसा तो जाणून घ्या

कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु झाला आहे. या टप्प्यात ज्येष्ठ नागरिक तसेच 45 ते 60 वयोगटातील व्यक्तींच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे.

अखेर ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणातला गोंधळ होणार दूर, कसा तो जाणून घ्या

sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई: ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणातील गोंधळ दूर करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी कोविन ॲप नोंदणी करण्यात येणार आहे. सामाजिक न्याय विभागाच्या कार्यालयात कोविन ॲप नोंदणी होणार असून ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.     

कोविन डिजीटल ऍपमध्ये नोंदणी करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनाच लसीकरणाचा लाभ घेता येतो. मात्र या ऍपबद्दल ज्येष्ठ नागरिकांना कोणत्याही प्रकारची माहिती नाही. तसेच ऍपवर नोंदणी करण्यासाठी लागणाऱ्या माहितीच्या अभावामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणाचा सहभागी होण्यासाठी अनेक अडचणी येत असल्याचे सध्या दिसून येत आहे. हे लक्षात घेत सामाजिक न्याय विभागांने ज्येष्ठ नागरिकांना कोविन ऍप नोंदणी सुविधा केंद्र उपलब्ध करुन देण्याचे ठरविले आहे.
      
सध्या कोरोनापासून बचाव करण्यासाठी कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु झाला आहे. या टप्प्यात ज्येष्ठ नागरिक तसेच 45 ते 60 वयोगटातील गंभीर आजार असलेल्या व्यक्तींच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. त्यात सहभागी होण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना अनेक अडचणी येत असल्याचे सध्या दिसून येत आहे. हे लक्षात घेता सामाजिक न्याय विभागाने ज्येष्ठ नागरिकांना कोविन ऍप नोंदणी सुविधा केंद्र उपलब्ध करुन देण्याचे ठरविले आहे. ज्येष्ठ नागरिकांना सदर लसीकरणाचा लाभ मिळावा यासाठी कोविन नोंदणी सुविधा केंद्र सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हास्तरीय सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्या कार्यालयात सुरु करण्यात येत आहे. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
 
गर्दी न करता लसीकरण प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन

कोविन अँपच्या वाढत्या तक्रारींमुळे रुग्णालय प्रशासन आणि नागरिकांना अडचणीचा सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे ज्यांना जमेल अशा नागरिकांनी घरी अँपवर नोंदणी करून लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर यावे आणि ज्या नागरिकांना अँपवर माहिती भरणे शक्य नाही अशा नागरिकांनी नोंदणीसाठी केंद्रावर यावे. सर्वांना लस मिळणार असून तातडीने लसीकरणासाठी गर्दी न करण्याचे आवाहन पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकणी यांनी केले आहे. 

हेही वाचा- काळजी घेण्याची गरज, मुंबईत गुरुवारी कोरोना रुग्णांचा आकडा हजारच्या पार 

कोविनमधील तांत्रिक बिघाड झाल्यामुळे बऱ्याच केंद्रांवर गर्दी जमा झाली. त्यानंतर बुधवारी 4 नंतर काही काळ हे अँप बंद होत असल्याने ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणात अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे लसीकरण प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या नागरिकांनी रजिस्ट्रेशन बाहेरून केल्यास रुग्णालय प्रशासनवरील ताण कमी होईल असे ही काकाणी यांनी सांगितले.

--------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Covin app for senior citizens will be registered remove confusion vaccination

loading image