कोळीवाडा स्मार्ट! आता एका क्लिकवर ताजा म्हावरा दारात...

सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 21 एप्रिल 2020

  • ‘बोंबील’ ॲपची निर्मिती;
  • मच्छीमारांची मोफत नोंदणी

पाली : रायगड, ठाणे, मुंबई आणि पालघर येथील सागरी मच्छीमारांची सहकार चळवळ उभी करण्यासाठी तसेच या आधुनिकतेच्या काळात शहरे स्मार्ट होत असताना आपले कोळीवाडे स्मार्ट करण्याच्या उद्देशाने ‘बोंबील’ On-Demand Platform App ची निर्मिती करण्यात आली आहे. या ॲपद्वारे ताजी, स्वच्छ आणि स्वस्त मासळी एका क्लिकवर घरपोच मिळणार आहे.

मूळचे अलिबाग येथील असलेले नासाचे शास्त्रज्ञ प्रणित पाटील यांच्या संकल्पनेतून सागरी मच्छीमारांसाठी हे ॲप तयार केले असून, यावर मच्छीमारांना मोफत नोंदणी करता येणार आहे. 

मुंबईतील महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सध्या जगावर कोरोना सावट आले आहे. याचा मोठा फटका मत्स्यव्यवसायाला म्हणजे आगरी-कोळी बांधवांना बसला आहे. अत्यावश्यक सेवेत ‘मासळी’चा समावेश असूनही बातम्यांतून मिळालेल्या माहितीनुसार 28 हजार बोटी या किनाऱ्यावर उभ्या आहेत. मासळीशिवाय एकही दिवस न राहणारे अनेकजण आज मासे मिळत नसल्याने मिळत असलेल्या पदार्थांवर दिवस ढकलत आहेत. याच वेळेत खवय्यांना घरपोच मासळी देण्याचे आणि तेही स्वस्त, स्वच्छता (hygiene) व सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून. त्यामुळे आता मासे खाण्यासाठी वाट पाहण्याची अन् घाबरण्याची गरज नाही.

आपल्याला आपल्या भागात थेट बोटीवरून आलेले ताजे मासे देण्याच्या ‘बोंबील’ ॲप प्रयत्नात आहे. या बोंबील ॲपद्वारे आम्ही मच्छीविक्रेत्यांना ‘मोफत’ नोंदणी करून घेणार आहोत, असे प्रणित पाटील यांनी सांगितले. बोंबीलच्या या सामाजिक प्रकल्पात तंत्रज्ञान हाताळण्याची जबाबदारी विनोद खारिक, सुशांत म्हात्रे, भूषण तांडेल यांनी घेतली आहे. समाजातील लोकांमध्ये या चळवळीची जनजागृती करण्यासाठी योगेश पाटील, स्वप्नील पाटील यांनी पुढाकार घेतला असून, स्वत: मच्छीमार व वितरक असणारे गणेश नाखवा या प्रकल्पाला कोळणीची साखळी करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. 

अधिक आणि सविस्तर बातम्या वाचण्यासाठी ईपेपर वाचा

 ॲपचे नाव बोंबील असले तरी येथे सागर व खाडीतील सर्व प्रकारची मासळी मिळणार आहे. बोंबील ॲपद्वारे ही सेवा सुरुवातीला टप्प्याटप्प्याने चारही सागरी जिल्ह्यांत देणार आहोत. म्हणून थोडाही विलंब न करता आत्ताच ‘बोंबील’ ॲपमध्ये आपली नोंदणी करून घ्या, असे शास्त्रज्ञ प्रणित पाटील यांनी सांगितले. सध्या संकेतस्थळ आणि गुगल प्लेस्टोरवर हा ॲप उपलब्ध आहे. संकेतस्थळ - Www.bombill.com

विक्रेता म्हणून नोंदणीसाठी संपर्क:
योगेश पाटील (+91 832-9710039)
स्वप्निल पाटील (+91 93595 36913)
सुशांत म्हात्रे (+91 89283 76263)
सुशांत पाटील वसई (99304 26459)
(टीप : विक्रेता म्हणून केवळ सध्या असलेल्या कोळींनीच यात नोदणी करता येईल)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Creation of Bombil On Demand Platform App