गर्भपाताच्या औषधांची ऑनलाईन विक्री? Amazon वर गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime against Amazon for selling abortion medicine mumbai
गर्भपातांच्या औषधविक्री प्रकरणी अ‍ॅमेझॉनवर गुन्हा

गर्भपाताच्या औषधांची ऑनलाईन विक्री? Amazon वर गुन्हा दाखल

मुंबई : गर्भपातासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांच्या नियमबाह्य विक्रीप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाने औषध निरीक्षक (गुप्तवार्ता) मुख्यालयाद्वारे ॲमेझॉनविरोधात गुन्हा दाखल केला आहे. खेरवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

अन्न व औषध प्रशासन विभागाने डॉक्टरांच्या चिठ्ठीविना गर्भपात करण्याची किट ऑनलाईन मिळते का, याबाबत पडताळणी केली. त्यानुसार ॲमेझॉन(Amazon) ई-कॉमर्स संकेतस्थळावर एका कंपनीचे गर्भपाताचे औषध उपलब्ध असल्याचे निदर्शनास आले.

संबंधित औषधाबाबत अ‍ॅमेझॉनवर डॉक्टरांच्या चिठ्ठीविना ऑर्डर स्वीकारण्यात आली आणि औषध घरपोच आले. औषधांबरोबर बिल पाठवण्यात आले नसल्याचे अन्न आणि औषध प्रशासनाच्या निदर्शनास आले. गर्भपाताच्या(Abortion) औषधविक्रीबाबत ॲमेझॉनच्या विक्रेता सेवेकडे विचारणा करण्यात आली असता ती ओरिसाहून आल्याचे सांगण्यात आले.

ॲमेझॉनने पुरवलेल्या माहितीच्या आधारे तपास केला असता ओरिसामधील विक्रेत्याने औषध पुरवलेच नसल्याचे आढळले. त्याने औषध विक्री दुकानाची कागदपत्रे वापरून ॲमेझॉनवर नोंदणी केली होती.

Web Title: Crime Against Amazon For Selling Abortion Medicine Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top