गुन्हे शाखेकडून धडक कारवाई, 430 किलो भेसळयुक्त चहा पावडर जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime

गुन्हे शाखेच्या पोलिसांनी भेसळयुक्त चहा पावडर पकडली आहे.

गुन्हे शाखेकडून धडक कारवाई, 430 किलो भेसळयुक्त चहा पावडर जप्त

आतापर्यंत दुधातील भेसळ, पनीर मधील भेसळ अशा काही भेसळी संदर्भातील बातम्या आपण वाचल्या असतील. मात्र आता भेसळी संदर्भातील एक वेगळी बातमी समोर आली आहे. शिवडीच्या बंदररोड परिसरात पोलिसांनी चक्क भेसळयुक्त चहा पावडर पकडली आहे.

मिळालेली माहिती अशी की, गुन्हे शाखेच्या पोलिसांनी भेसळयुक्त चहा पावडर पकडली आहे. पोलिसांनी या कारवाईत ४३० किलोची भेसळयुक्त चहा पावडर शिवडीच्या बंदररोड परिसरातून जप्त करण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरात खळबळ पसरली आहे. सध्या बाजारात या भेसळयुक्त चहा पावडरची किंमत ८५ हजार रुपये इतकी आहे. याप्रकरणी पोलिसांनी राजू अबुलजहर शेख, राहुल शेख या दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी या दोघांना अटक केली असून या प्रकरणासंदर्भातील अधिकचा तपास पोलिस करत आहेत.