१८८५ फेरीवाल्यांवर महापालिकेची कारवाई

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 डिसेंबर 2018

मुंबई - बोरिवली रेल्वेस्थानकाजवळ रस्त्यांवर बस्तान मांडलेल्या १८८५ फेरीवाल्यांवर महापालिकेने धडक कारवाई केली. अनधिकृत भाजी आणि फळविक्रेते, कपडे व अन्य वस्तूंचे विक्रेते आणि बेकायदा खाद्यपदार्थांचे स्टॉल हटवल्यामुळे स्थानक परिसरातील पदपथ मोकळे झाले आहेत.

बोरिवली रेल्वेस्थानकाजवळच्या रस्त्यांवरील अनधिकृत फेरीवाल्यांमुळे वाहतुकीत अडथळा येत होता. पादचाऱ्यांनाही त्रास होत होता. अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रेत्यांमुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होण्याची शक्‍यता होती. त्याकडे लक्ष वेधून महापालिकेने गेल्या महिन्यापासून फेरीवाल्यांवर कारवाई सुरू केली. महापालिकेने अनधिकृत फेरीवाल्यांना हटवल्यामुळे पदपथ आणि रस्ते मोकळे झाल्याने पादचारी आणि वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे, असे सहायक आयुक्त रमाकांत बिरादार यांनी सांगितले.

इथे झाली कारवाई  बोरिवली स्थानकाचा पूर्व व पश्‍चिम परिसर, मागाठाणे, दत्तपाडा, सुदाम नगर, काजूपाडा, गोराई, चारकोप आणि बोरसापाडा. 
हटवलेले फेरीवाले - १८८५ 
जप्त केलेले गॅस सिलिंडर - ३२ 
जप्त केलेल्या शेगड्या - १४३

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crime on Hockers by Municipal