esakal | चार वर्षाच्या मुलाला सावत्र पित्याकडून इस्त्रीचे चटके; आजीच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

चार वर्षाच्या मुलाला सावत्र पित्याकडून इस्त्रीचे चटके; आजीच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

 मुलीचा पुन्हा सावरलेला संसार तुटेल या भीतीने आजीने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. पण या घटनेमुळे मुलाने सावत्र पित्याला घाबरू लागला

चार वर्षाच्या मुलाला सावत्र पित्याकडून इस्त्रीचे चटके; आजीच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

sakal_logo
By
अनिश पाटील

मुंबई - चार वर्षाच्या मुलाच्या ढुंगणावर इस्त्रीचे चटके दिल्याप्रकरणी मानखुर्द पोलिसांनी सावत्र पित्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुलाच्या आजीच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
तक्रारदार 46 वर्षीय महिला मानखुर्द मंडाळा परिसरात राहते. त्यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या मुलीचा 2020 मध्ये घटस्फोट झाला होता. त्या पतीपासून तिला चार वर्ष चार महिन्यांचा मुलगा आहे. जून 2020 त्यांच्या मुलीने त्यांच्याच परिसरात राहणा-या 25 वर्षीय तरुणासोबत लग्न केले. त्यावेळी सुरूवातीचे तीन महिने हा मुलगा त्याच्या आजीकडेच राहत होता. पण ऑक्टोबरमध्ये मुलाई आई त्याला त्यांच्या घरी घेऊन गेली.

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

तक्रारदार महिलेची मुलगी करी रोड परिसरात नोकरीला जाते. त्यावेळी ती मुलाला आजीकडे सोडायची, तर काही दिवस मुलगा सावत्र पित्यासोबत रहायचा. नोव्हेंबर 2020 मध्ये तक्रारदार महिलेचा नातू त्यांच्या घरी आला असता रडत होता. त्याला त्याबाबत विचारले असता त्याने चड्डीच्या मागे हात लावून पप्पांनी इस्त्रीचे चटके दिल्याचे सांगितले. अखेर महिलेने तपासले असता त्याच्या दोनही ढुंगणावर चटक्याचे व्रण होते. त्यांच्या मुलाने त्याचे छायाचित्र काढले व मुलावर उपचार केले. त्यावेळी तक्रारदार यांना याबाबत पोलिसांत तक्रार करायची होती. पण मुलीचा पुन्हा सावरलेला संसार तुटेल या भीतीने त्यांनी हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. पण या घटनेमुळे मुलाने सावत्र पित्याला घाबरू लागला. तो सावत्र पित्याला पाहिल्यानंतर धसका घ्यायचा. त्यामुळे त्याच्या आजीला नातवाची काळजी वाटू लागली. त्यामुळे मुलाच्या आजीने धैर्य दाखवत अखेर याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी भादंवि कलम 324 सह बाल न्याय(काळजी व संरक्षण) अधिनियम, 2000 कलम 23 अंतर्गत सावत्र पित्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

---------------------------------------

crime marathi news Ironing stepfather to child numbai live latest updates

loading image