अल्पवयीन मुलीला पॉर्न दाखवून शिक्षकाचे अश्लील चाळे; आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

अनिश पाटील
Thursday, 11 February 2021

प्रभादेवी येथील खासगी शिकवणीत 15 वर्षीय मुलीला पॉर्न व्हिडिओ दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दादर पोलिसांनी 28 वर्षीय खासगी शिकवणीच्या शिक्षकाला अटक केली आहे.

मुंबई  : प्रभादेवी येथील खासगी शिकवणीत 15 वर्षीय मुलीला पॉर्न व्हिडिओ दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दादर पोलिसांनी 28 वर्षीय खासगी शिकवणीच्या शिक्षकाला अटक केली आहे. 

तक्रारदार मुलगी वरळी परिसरात वास्तव्याला आहे. तिच्या आईने याप्रकरणी तक्रार केली असून त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने क्लासमध्ये कोणी नसल्याचा फायदा घेऊन तिला पॉर्न व्हिडिओ दाखवले. त्यानंतर अश्लील चाळे केले. हा प्रकार मुलीने कुटुंबियांना सांगितल्यानंतर याप्रकरणी तक्रार करण्यात आली. त्यानुसार दादर पोलिसांनी भादंवि कलम 354 सह बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्याच्या कलम 8, 10 व 12 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई, रायगड, पालघर, ठाणे परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

आरोपीला पुढील तपासाससाठी अटक करण्यात आील असून याप्रकरणी पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. आरोपीने अशा प्रकारचे कृत्य इतर मुलांसोबतही केले आहे का? याबाबत तपास सुरू असून इतर मुलांना व त्यांच्या कुटुंबियांनाही विश्वासात घेऊन तपास करण्यात येणार आहे.

-----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

crime marathi private teacher show abused video minor girl mumbai latest


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crime marathi private teacher show abused video minor girl mumbai latest