Crime News: पोलिसाला शिवीगाळ प्रकरणी एकावर गुन्हा !

Fraud
FraudCrime
Updated on

Crime News: देवरुख येथे कर्तव्य बजावणाऱ्या एका पोलिसावरच हल्ला केल्याची घटना काल (ता.१) रात्री उशिरा घडली. याप्रकरणी साडवली सह्याद्री नगर येथील एका तरुणावर देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश शिवाजी मोहिते असे संशयिताचे नाव आहे.

देवरूख पोलीस ठाण्यात मिळालेल्या माहितीनुसार यासंबधी पोलीस हवालदार प्रशांत मसुरकर यांनी फिर्याद दिली आहे. मसुरकर हे देवरूख सावरकर चौक येथे हॉटेलमध्ये झालेल्या मारहाणीच्या ठीकाणी कर्तव्य बजावत होते. त्यांनी रमेश मोहिते याला औषध उपचार करणेसाठी सरकारी वाहनामध्ये बसण्यास सांगितले.

त्यावेळी रमेश हा मसुरकर यांच्या अंगावर धावून गेला आणि त्याने शिवीगाळ केली. मसुरकर यांनी दिलेल्या फिर्यादेनुसार रमेश मोहिते याच्यावर सरकारी कामत अडथळा केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.