

डोंबिवली : रस्त्याने पायी चालणारे नागरिक हेरून त्यांच्याकडील मोबाईल, सोनसाखळी, रस्त्यावर उभ्या असलेल्या मोटारसायकल तो चोरायचा. शहाड रेल्वे स्थानक परिसरातील मोटारसायकल चोरायला तो आला पण त्याचा हा डाव फसला आणि मानपाडा पोलिसांनी इराणी चोरट्यास बेड्या ठोकल्या आहेत.
मुस्तफा उर्फ मुस्सु जाफर सैयद उर्फ इराणी (वय 24) असे अटक आरोपीचे नाव असून पोलिसांनी 13 गुन्ह्यांची उकल करत इराणी कडून 4 लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. डोंबिवली पूर्वेतील नंदिवली परिसरात राहणारे शरद कडुकर हे 3 जूनला सकाळी 7 च्या सुमारास भोपर कमाणी जवळ पायी चालत जात असताना इराणी याने त्यांच्या पाठीमागून येऊन मोबाईल चोरत पळ काढला होता.
याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. गुन्हा दाखल होताच डोंबिवलीचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेश मदने, सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश वनवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल तारमळे, भानुदास काटकर, पोलीस हवालदार राजकुमार खिलारे, शिरीष पाटील, सुनिल पवार, यल्लापा पाटील, देवा पवार, अशोक आहेर, विजय आव्हाड अशा गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या वेगवेगळ्या टिम तयार करण्यात आल्या. गुप्त बातमीदार तसेच वर्णनावावरून पोलीस 15 दिवस आरोपीचा शोध घेत होते.
गुन्हे प्रकटीकरण पथकास मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे पोलिसांनी शहाड, कल्याण भागात सापळा रचला. एक व्यक्ती मोटार सायकल घेण्यासाठी शहाड रेल्वे स्टेशन परिसरात आला असता त्यांचा संशय आल्याने त्यास पोलिसांनी जागीच पकडुन त्यांचेकडे विचारपुस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
इराणी याने मानपाडा, कळवा पोलीस स्टेशन, शिवाजीनगर पोलीस स्टेशन, मध्यवर्ती पोलीस स्टेशन, नारपोली पोलीस स्टेशन, कोळसेवाडी पोलीस ठाण्यांचे हददीत त्यांने साथीदाराचे मदतीने चेन स्नॅचिंग, मोबाईल स्नॅचिंग, मोटार सायकल चोरीचे गुन्हे केल्यांची कबुली दिली. तसेच त्याच्यावर महात्मा फुले पोलीस स्टेशन, कोळसेवाडी पोलीस ठाणे, खडकपाडा पोलीस ठाणे, मानपाडा पोलीस स्टेशन, डोबिवली पोलीस स्टेशन येथे यापुर्वी 21 गुन्हे दाखल असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त कुराडे यांनी दिली.
इराणी यांच्याकडून पोलिसांनी सोन्याचे दागिने 8 मोटार सायकली, 5 मोबाईल फोन असा एकुण 4 लाख 25 हजार रुपये किमतीचा मुददेमाल जप्त केला आहे. इराणी याच्या साथीदाराचा शोध घेण्यात येत असून या कारवाईत एकुण 1 चैन स्नॅचिंग, 4 मोबाईल स्नॅचिंग व 8 मोटार सायकलचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.