एल्गार परिषद प्रकरण: आरोपी कवी वर्वरा राव यांना हायकोर्टाचा दिलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

varvara rao

एल्गार परिषद प्रकरण: आरोपी कवी वर्वरा राव यांना हायकोर्टाचा दिलासा

sakal_logo
By
सुनिता महामुनकर

मुंबई : एल्गार परिषद (Elgar parishad) प्रकरणातील आरोपी कवी वर्वरा राव (var vara rao) यांना आज मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai high court) दिलासा दिला. येत्या ता. 14 ऑक्टोबरपर्यंत तळोजा कारागृहात (Taloja jail) शरण येऊ नये, असे निर्देश न्यायालयाने राव यांना दिले आहेत.

हेही वाचा: गिरण्यांच्या चाळींचे पुनर्वसन; केंद्राकडे प्रस्ताव पाठवणार

राव (82) यांना फेब्रुवारीमध्ये उच्च न्यायालयाने वैद्यकीय कारणांवरून जामीन मंजूर केला आहे. सध्या ते मुंबईमध्ये राहत असून मुंबई सोडून जाण्याची परवानगी त्यांना न्यायालयाने दिलेली नाही. हा जामीन सहा महिन्यांसाठी आहे. राव यांनी जामिनाचा अवधी वाढविण्यासाठी आणि त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी पुन्हा न्यायालयात याचिका केली आहे. याचिकेवर आज न्या एस एस शिंदे आणि न्या एन जे जमादार यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.

राव यांच्यावर तूर्तास एनआयए कठोर कारवाई करणार नाही, अशी हमी एनआयएकडून न्यायालयात देण्यात आली. त्यामुळे खंडपीठाने पुढील सुनावणी ता 13 रोजी निश्चित केली. तोपर्यंत राव यांनी कारागृहात हजर राहण्याची आवश्यकता नाही, असे खंडपीठाने स्पष्ट केले. एल्गार परिषद प्रकरणात पंधरा आरोपी आहेत. त्यापैकी केवळ राव यांनाच जामीन मंजूर झाला आहे. उच्च रक्तदाबसह विविध आजारांनी ते ग्रस्त आहेत. राव यांचा जामिन अवधी वाढविण्याला एनआयएने प्रतिज्ञापत्रात विरोध केला होता. त्यांना गंभीर आजार झालेला नाही आणि कारागृहात त्यांच्यावर योग्य उपचार होतील, असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

loading image
go to top