

मुंबई : मुंबईच्या मालाड मालवणी परिसरात एक धक्कादायक घटना घडली असून एका महिलेने इमारतीतील एका कुत्र्यावर अॅसिड फेकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आपल्या मांजरीसोबत कुत्रा खेळतो म्हणून हे कृत्य करण्यात आले असून महिलेचे हे कृत्य इमारतीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
शबीस्ता सुहेल अन्सारी असं श्वानावर अॅसिड हल्ला करणाऱ्या महिलेचे नाव असून याप्रकरणी मालाड मालवणी पोलीस ठाण्यामध्ये महिलेविरोधात कलम 429 भादवी सह कलम 11(1) (अ) प्राण्यांना क्रुरतेने वागण्याचे प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम 1960 सह कलम 119 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहितीनुसार, मालाड पश्चिमेकडील मालवणी गायकवाड नगर परिसरात 16 ऑगस्ट च्या दुपारी शबीस्ता सुहेल अन्सारी यांच्या मांजराबरोबर ब्राउनी नावाचा श्वान इमारतीच्या गेट जवळ खेळत होता. मांजर आणि श्वान यांची मस्ती चालू असताना श्वान त्या मांजरीच्या मागे देखील लागायचा मात्र हे शबिस्ता अन्सारी हिला आवडले नाही.
त्यानंतर तिने इमारतीत जात घरातून अॅसिड आणले आणि ब्राउनी या श्वानावर अॅसिड हल्ला केला. या अॅसिड हल्ल्यात श्वानाला गंभीर इजा झाली असून त्याच्या डोळ्याला देखील जखम झाली आहे. हल्ल्यानंतर श्वान किंकाळताना दिसत असून या क्रूर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या घटनेनंतर बाळासाहेब तुकाराम भगत यांनी या महिलेविरोधात मालवणी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली. दिलेल्या तक्रारीवरून शहिस्ता अन्सारी या महिलेविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस पुढील तपास करत असल्याची माहिती आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.