महिला परिचारिकेच्या विनयभंगामुळे डॉक्‍टरवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

मागील 2 वर्षांपासून ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या एका महिला परिचारिकेसमोर वारंवार अश्‍लील कृत्य करून मानसिक व शारीरिक त्रास दिला असल्याचा आरोप केला आहे.

मुरबाड : मुरबाड ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अखिलेश शिंदे यांच्यावर मुरबाड पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

डॉ. शिंदे यांनी मागील 2 वर्षांपासून ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या एका महिला परिचारिकेसमोर वारंवार अश्‍लील कृत्य करून मानसिक व शारीरिक त्रास दिला असल्याचा आरोप केला आहे. तसेच रुग्णांच्या समोर शिवीगाळ केल्याचाही आरोप शिंदे यांच्यावर करण्यात आला आहे.

याबाबत परिचारिकेने वरिष्ठांनाही कळवले होते. अखेर मानसिक त्रास सहन न झाल्याने तिने मुरबाड पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crimes against doctors due to disrespect for female hostess