'शिवसेनेच्या कंपाऊंडरला हेडलाईन बनवण्याची भूक'; राऊत-फडणवीस भेटींवर कॉंग्रेस नेत्याची खोचक टीका

तुषार सोनवणे
Sunday, 27 September 2020

कॉंग्रेसचे जेष्ट नेते संजय निरूपम यांनी संजय राऊतांवर खोचक टीका केली आहे.

मुंबई - शनिवारी शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे राज्यात राजकीय चर्चांना उधान आले होते. परंतु ही भेट दै सामनासाठी मुलाखत घेण्यासाठी असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. भाजपच्या अनेक बड्या नेत्यांनीही यावर प्रतिक्रीया दिली. कॉंग्रेसचे जेष्ट नेते संजय निरूपम यांनी संजय राऊतांवर खोचक टीका केली आहे.

मध्य रेल्वे मार्गावरही महिला प्रवाशांसाठी विशेष लोकल सुरु करा, महिला प्रवाशांची मागणी

महाविकास आघाडी स्थापन करण्यात संजय राऊत यांची भूमिका महत्वाची होती. परंतु त्यांनीच विरोधी पक्षनेते आणि सध्याचे आपले कट्टर राजकीय विरोधक असलेले देवेंद्र फडणवीस .यांची पंचतारांकीत हॉटेलमध्ये भेट घेतली. या भेटीचे कारण जरी दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आलेले असले तरी, त्यामुळे राजकीय चर्चा रंगू लागल्या होत्या. पंरतु याबाबत कॉंग्रेसचे जेष्ट नेते संजय निरूपम यांनी संजय राऊत यांच्यावर खोचक टीका केली आहे..

दीपिका, श्रद्धा, रकुल यांच्या ब्रॅण्डच्या जाहिरातीवर मोठा परिणाम, साराला एका ब्रॅण्डकडून डच्चू

संजय निरुपम यांनी राऊत-फडणवीस भेटीवर एक ट्विट केले आहे. त्यात ते म्हणतात की, “शिवसेनेच्या कंपाऊंडरला हेडलाइनमध्ये बनविण्याची चांगलीच भूक लागली आहे. ही भूक राजकीय नेत्यांना बहुतेकवेळा खाऊन टाकते. ही दुर्भावना नसून एक वास्तविकता आहे.”

संजय निरूपम यांनी गेल्या काही दिवसांपासून अनेकदा कॉंग्रेसला अडचणीत आणणाऱ्या भूमिका घेतल्या आहेत.  सध्या कॉंग्रेस महाविकास आघाडी सरकारचा भाग आहे. त्यांनी राऊतांवर केलेली टीका सेनेच्या जिव्हारी लागू शकते. हे नक्की


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Criticism of Congress leader sanjay nirupam on Raut Fadnavis meeting