शहापूरमध्ये 107 गावांतील पिके उद्‌ध्वस्त; 3 हजार शेतकऱ्यांना फटका

नरेंद्र जाधव
Sunday, 18 October 2020

पावसामुळे तालुक्‍यातील 107 गावांतील भातपिके बाधित झाली असून सुमारे 3 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना या पावसाचा फटका बसल्याचा अंदाच शासनाच्या प्राथमिक सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे.

खर्डी : गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे शहापूर तालुक्‍यातील तब्बल 797 हेक्‍टर शेतीखालील क्षेत्र बाधित झाले आहे; तसेच त्यात आणखी वाढ होण्याची शक्‍यता आहे. पावसामुळे तालुक्‍यातील 107 गावांतील भातपिके बाधित झाली असून सुमारे 3 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना या पावसाचा फटका बसल्याचा अंदाच शासनाच्या प्राथमिक सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे शासनाने नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे. 

ई-संजीवनीद्वारे रुग्ण तपासणीच्या वेळेत वाढ, 6000 पेक्षा अधिक रुग्णांना लाभ

वादळी पावसामुळे बळीराजाचे कापलेल्या पिकाबरोबरच शेतातील उभे पीकही वाहून गेले आहे; तर उर्वरित पाण्यात भिजून सडून गेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या भातपिकाचे सर्वाधिक नुकसान झाले. संपूर्ण मेहनत वाया गेल्याने व हाती काहीच शिल्लक न राहिल्याने बळीराजासमोर आता उपासमारीचे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांकडून शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची मागणी होत आहे. याची तातडीने दखल घेत शहापूरच्या तहसीलदार नीलिमा सूर्यवंशी यांनी महसूल, कृषी आणि पंचायत समिती विभागाच्या अधिकाऱ्यांना भातपिकाच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार महसूल विभागाचे पंचनामे करण्याचे काम शनिवारपासून (ता. 17) सुरू केले आहे. 

मीरा भाईंदरच्या पाणी प्रश्नावर मंत्रालयात बैठक, पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिक संतप्त

पंचनामे करण्यास सुरुवात 
शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई मिळावी, यासाठी शहापूरच्या तहसीलदार नीलिमा सूर्यवंशी यांनी तालुक्‍यातील 200 हून अधिक गावांचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल, कृषी व पंचायत समिती या विभागांना दिले आहेत. त्यानुसार महसूल विभागाचे मंडळ अधिकारी, तलाठी यांनी तालुक्‍यात प्रत्यक्ष शेतांमध्ये जात नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केल्याचे तहसीलदारांनी सांगितले. 
-------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे ) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crops in 107 villages destroyed in Shahapur 3 thousand farmers hit