लॉकडाऊनमध्येही रेल्वे सुसाट ! कमावला 'इतक्या' कोटींचा महसूल

प्रशांत कांबळे
Monday, 10 August 2020

पार्सल व्हॅन आणि दुधांचे टँक वॅगन, औषधी, आरोग्य तपासणीचे साहित्य, अन्नधान्य, दुध पावडर, आणि जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुद्धा देशभरात करण्यात आली आहे.

मुंबई: लाॅकडाऊनदरम्यान प्रवासी वाहतूक बंद असूनही पश्चिम रेल्वेने मालवाहतूक अत्यंत प्रभावीपणे राबवून तब्बल 3 हजार कोटी रूपयांच्या महसुलाचा आकडा पार केला आहे. 

नक्की वाचा : नवी मुंबईतील 'या' रेल्वे स्थानकाचे काम संथगतीने; आणखी एक वर्ष करावी लागणार प्रतीक्षा!

लाॅकडाऊनमुळे पश्चिम रेल्वेने पुर्णवेळ मालवाहतुकीवर भर दिला. त्यामुळे इतर विभागांपेक्षा पश्चिम रेल्वेला सर्वात जास्त उत्पन्न मिळाले असून 22 मार्च ते  8 ऑगस्टपर्यंत सुमारे 3004.49 कोटींचा महसुल रेल्वेने मिळवला. यामध्ये पेट्रोलीयम पदार्थांचे 1231, रासायनीक खते 2015, मीठ 617, खाद्यपदार्थ 114, सिमेंट 913, कोळसा 447, कंटेरनर 5374 आणि जनरल मालवाहतूकीचे 52 असे एकूण 23.69 मिलीयन टन वजनाची मालवाहतूक संपूर्ण देशात पश्चिम रेल्वेने केली.

महत्वाची बातमी : गणेशोत्सवासाठी विशेष रेल्वे गाड्यांची चौकशी करताय? वाचा ही महत्त्वाची बातमी...

त्यासोबतच पार्सल व्हॅन आणि दुधांचे टँक वॅगन, औषधी, आरोग्य तपासणीचे साहित्य, अन्नधान्य, दुध पावडर, आणि जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुद्धा देशभरात करण्यात आली आहे.

(संपादन : वैभव गाटे)

crossing the revenue milestone of Rs 3000 crore by western railway

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crossing the revenue milestone of Rs 3000 crore by western railway