Shivrajyabhishek Sohala : रायगडावर शिवभक्तांची अलोट गर्दी;शिवराज्याभिषेक दिन उत्साहात

देशभरातून आलेल्या लाखो शिवभक्तांच्या अलोट गर्दीमध्ये दुर्गराज रायगड आज फुलून गेला. शिवरायांना त्रिवार वंदन करत आज येथे शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा झाला.
Shivrajyabhishek Sohala
Shivrajyabhishek Sohalasakal

रायगड : देशभरातून आलेल्या लाखो शिवभक्तांच्या अलोट गर्दीमध्ये दुर्गराज रायगड आज फुलून गेला. शिवरायांना त्रिवार वंदन करत आज येथे शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा झाला. साडेतीनशेव्या सोहळ्याचे औचित्य साधून हा सोहळा आंतरराष्ट्रीय करण्याचा निर्धार लाखो शिवभक्तांनी केला. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती व शहाजीराजे छत्रपती, संयोगिताराजे छत्रपती यांची या सोहळ्यास प्रमुख उपस्थिती होती.

सकाळी दहा वाजता ‘बोला छत्रपती बोला’ हे सूर निनादले आणि उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. या गीताच्या तालावर जल्लोष करत राज्याभिषेकाचे विधी झाले. मेघडंबरी येथील छत्रपती शिवरायांच्या सिंहासनाधिष्ठीत पुतळ्यावर नाण्यांचा अभिषेक करण्यात आला.

मंत्रोच्चारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या उत्सवमूर्तीवर जल व दुग्धाभिषेक करण्यात आला. तत्पूर्वी लाखो शिवभक्तांचा उत्साह पहाटेपासून टिपेला गेला. शाहिरांनी डफ, तुणतुणे व ढोलकीच्या ठेक्यावर पोवाडे सादर करत शिवशौर्याचा जागर घातला. खांद्यावर भगवा झेंडा, डोक्यावर भगवी टोपी आणि कपाळाला अष्टगंधामुळे सारा माहौल भगवा झाला होता.

शिवराज्याभिषेक सोहळ्यानंतर पोलिसांकडून महाराष्ट्र गीताची धून वाजवत मानवंदना देण्यात आली. मुख्य समारंभानंतर शिवरायांच्या पालखीची राजसदरेपासून जगदीश्वर मंदिर ते शिवसमाधी अशी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. हेलिकॉप्टरद्वारे शिवराज्याभिषेक स्थळी पुष्पवृष्टी करण्यात आली.तत्पूर्वी सकाळी सात वाजता शहाजीराजे यांच्या हस्ते नगारखाना येथे ध्वजपूजन व ध्वजारोहण करून कार्यक्रमास सुरुवात झाली. साडेसात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com