मेगाब्लॉकमुळे लोकल ट्रेनमध्ये गर्दीच गर्दी; नियमांचे उल्लंघन करून अनेकांचा प्रवास

कुलदीप घायवट
Sunday, 10 January 2021

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी (ता.10) रोजी मेगाब्लॉक घेण्यात आला होता. परिणामी, काही लोकल सेवा रद्द केल्या. त्यामुळे लोकलमध्ये गर्दीचे चित्र तयार झाले होते.

रविवार ठरला गर्दीचा वार 

मुंबई  : मध्य रेल्वे मार्गावर रविवारी (ता.10) रोजी मेगाब्लॉक घेण्यात आला होता. परिणामी, काही लोकल सेवा रद्द केल्या. त्यामुळे लोकलमध्ये गर्दीचे चित्र तयार झाले होते. मात्र, या गर्दी मध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांपेक्षा सर्व सामान्य प्रवासी प्रवास करताना दिसून आले. राज्य सरकारकडून सर्वसामान्य प्रवाशांना प्रवास करण्यास अद्याप अनुमती देण्यात आली नाही. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, काही विशेष सेवेतील कर्मचारी यांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तर, महिलांना ठराविक वेळेसाठी लोकल प्रवास करता येणार आहे. मात्र या प्रवाशांना वगळता नियमांचे उल्लंघन करून फेरीवाले, सामान्य प्रवासी, लहान मुले लोकल मधून प्रवास करताना दिसून येत आहे.

 

रविवारी, (ता.10) रोजी दुपारच्या सुमारास सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल फुल्ल भरून जात होत्या. तर, सायंकाळी कसारा, कल्याण दिशेकडील लोकलमध्ये गर्दी होती. पुढील आठवड्यात सर्व सामान्य प्रवाशांना लोकल प्रवास करण्याची परवानगी मिळेल की नाही, या संदर्भात निकाल लागणार आहे. यावेळी सर्व सामान्य प्रवाशांना लोकल प्रवास करण्यासाठी वेळेची मर्यादा असेल की, संपूर्ण वेळ प्रवास असेल ते येत्या मंगळवारी ठरणार आहे. मात्र, सध्या प्रवासी लोकल मधून प्रवास करत आहेत. 
अनेक प्रवासी तिकीट काढण्यासाठी वेगवेगळ्या शोधून तिकीट काढत आहेत. ज्या प्रवाशांना लोकल प्रवास मुभा आहे, अशा प्रवाशांकडून तिकीट काढून घेऊन प्रवास केला जात आहे. महिला प्रवासी देखील स्वतः तिकीट काढून इतर प्रवाशांना देत आहेत. तर, काही प्रवासी ज्या सुरक्षा व्यवस्था कमी आहे, अशा स्थानकात येऊन विना तिकीट प्रवास करत आहेत.

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

पीक अव्हरमध्ये गर्दीच गर्दी
कोरोनामुळे फिजिकल डिस्टंसिंगचे पालन करण्यासाठी प्रत्येक लोकलमधून 700 प्रवाशांना प्रवास करण्याचे नियोजन पश्चिम आणि मध्य रेल्वे प्रशासनाकडून केले आहे. यासह पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या लोकलमध्ये प्रत्येक बाकावर 'येथे बसू नका' असे स्टिकर लावले आहेत.  मात्र, पीक अव्हरमध्ये प्रवाशांना उभे राहण्यास देखील जागा राहत नाही.  

Crowds in local trains due to megablocks Many travel in violation of the rules in mumbai

---------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crowds in local trains due to megablocks Many travel in violation of the rules in mumbai