समोरून येत होती ट्रेन, तेंव्हाच महिलेला आली चक्कर; CRPF चा जवान आला देवदूत बनून

समोरून येत होती ट्रेन, तेंव्हाच महिलेला आली चक्कर; CRPF चा जवान आला देवदूत बनून

मुंबई : घाई, गडबड, गर्दी यामुळे लोकलमध्ये अनेकदा अपघाताच्या घटना घडतात. कोरोना असल्याने सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि महिलांना लोकलमधून प्रवासास परवानगी देण्यात आली आहे. यामुळे ट्रेनमधील गर्दी कमी झाली आहे. कमी झालेल्या गर्दीमुळे ट्रेन अपघातांचे प्रमाण देखील तुलनेने कमी झालंय असं म्हंटल तर वावगं ठरू नये. मात्र नुकतीच मुंबईतील एका रेल्वे स्थानकावर एक चित्तथरारक घटना घडली, ज्यामध्ये समोरून ट्रेन येताच एका महिलेला भोवळ आल्याने ती अचानक ट्रॅकवर कोसळली.   

फलाटावरून तोल जाऊन एक २३ वर्षीय महिला थेट रेल्वे रुळावर कोसळली. मात्र एका CRPF जवानामुळे या महिलेचे प्राण वाचवले आहेत. त्याच झालं असं की, लोकल ट्रेन फलाटावर येत होती. लोकल फलाटावर येत असताताना फलाटाच्या कडेला उभ्या असणाऱ्या महिलेचा अचानक चक्कर आली आणि सदर महिला रुळावर कोसळली. मात्र एका CRPF च्या जवानाने प्रसंगावधान राखत महिलेचे प्राण वाचवलेत. सदर घटना मुंबईतील सॅण्डहर्ट्स रोड स्थानकावर घडलीये.   

मिळालेल्या माहितीनुसार या 23 वर्षीय महिलेचं नाव अनीशा शेख असं आहे. महिला चक्कर येऊन पडण्याची आणि समोरून ट्रेन येण्याची वेळ एकाच होती. मात्र केवळ CRPF जवानांच्या प्रसंगावधानतेमुळे तिचे प्राण वाचलेत आणि भीषण अपघातही टळला आहे. या महिलेला वाचवणाऱ्या CRPF जवानाचं नाव आहे श्याम सुरत. त्यांनी तातडीने ट्रॅकवर उडी घेतली आणि महिलेला पुन्हा प्लॅटफॉर्मवर आणलं. तर जमलेल्या नागरिकांनी ट्रेनला हात दाखवून थांबवण्याचा प्रयत्न केला. 

CRPF jawan saved life of 23 years old women fainted from platform to tracks on sandhurst road

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com