चारोटी उड्डाणपुलावर कंटेनरखाली चिरडली कार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

कासा ः कासा-मुंबई अहमदाबाद महामार्गावरील चारोटी उड्डाणपुलावर शनिवारी मुंबईकडे जाणारा कंटेनर गुजरातकडे जाणाऱ्या कारवर पडल्याने झालेल्या अपघातात कारमधील तिघे प्रवासी बचावले.

कासा ः कासा-मुंबई अहमदाबाद महामार्गावरील चारोटी उड्डाणपुलावर शनिवारी मुंबईकडे जाणारा कंटेनर गुजरातकडे जाणाऱ्या कारवर पडल्याने झालेल्या अपघातात कारमधील तिघे प्रवासी बचावले.

प्रवीण यशवंत पाटील (४५) आई-वडिलांसह उर्से येथे निघाले असताना शनिवारी (ता. २१) सकाळी ९ वाजता चारोटी उड्डाणपुलावर विरुद्ध मार्गिकेवरून नियंत्रण गमावलेला कंटेनर त्यांच्या कारवर कोसळला; मात्र या अपघातात कारमधील तिघे प्रवासी बचावले असून त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे.

यापूर्वी चारोटी उड्डाणपुलावर अनेक अपघात घडले आहेत. पुलावरील तीव्र वळण आणि उतार यामुळे अनेक वाहनचालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात होत आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A crumpled car under a container at a charoti in Dahanu near Palghar