CSMT Ghee Scandal: धक्कादायक! ‘मानवी सेवनासाठी नाही’ असे तूप मोटरमनच्या ताटात; सीएसएमटीतील ‘साई कटर्स’ कॅन्टीन बंद

सीएसएमटी मोटरमन लॉबीतील कॅन्टीनमध्ये ‘मानवी सेवनासाठी नाही’ असे स्पष्ट नमूद असलेले तूप वापरल्याचा प्रकार उघड; मध्य रेल्वेची तातडीची कारवाई, साई कटर्स कॅन्टीन बंद
The ‘Sai Cutters’ canteen at the CSMT motorman lobby was shut down after Central Railway officials found a product labelled ‘Not for Human Consumption’ being used to prepare food.

The ‘Sai Cutters’ canteen at the CSMT motorman lobby was shut down after Central Railway officials found a product labelled ‘Not for Human Consumption’ being used to prepare food.

Sakal

Updated on

नितीन बिनेकर

मुंबई : सीएसएमटी येथील मोटरमन लॉबीतील कटिंगमधून दररोज सुमारे ५०० मोटरमन आणि गार्ड नाश्ता आणि जेवण करतात. याच कटिंगमध्ये ‘मानवी सेवनासाठी नाही’ असे स्पष्टपणे नमूद असलेले तूप खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी वापरल्याचा धक्कादायक प्रकार मध्य रेल्वेच्या तपासणीत समोर आला. देवपूजा, दिवे लावणे आणि हवनासाठी वापरण्याच्या सूचना असलेले हे उत्पादन खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी वापरले जात असल्याचे आढळल्यानंतर मध्य रेल्वेने कारवाई केली. तपासणीचा अहवाल वरिष्ठ विभागीय परिचलन व्यवस्थापकांकडे पाठविण्यात आला असून, त्यानंतर ‘साई कटर्स’चे कॅन्टीन तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com