esakal | सीएसएमटी ते करमळी आणि मंगळुरु विशेष एक्सप्रेस; आठवड्यातून पाच दिवस धावणार
sakal

बोलून बातमी शोधा

सीएसएमटी ते करमळी आणि मंगळुरु विशेष एक्सप्रेस; आठवड्यातून पाच दिवस धावणार

प्रवाशांना नियोजनबद्ध आणि फिजिकल डिस्टन्सचे नियम पाळून प्रवास करता यावा, यासाठी मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावरून विशेष एक्सप्रेस सोडण्याचे नियोजन केले आहे

सीएसएमटी ते करमळी आणि मंगळुरु विशेष एक्सप्रेस; आठवड्यातून पाच दिवस धावणार

sakal_logo
By
कुलदीप घायवट

मुंबई :  प्रवाशांना नियोजनबद्ध आणि फिजिकल डिस्टन्सचे नियम पाळून प्रवास करता यावा, यासाठी मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावरून विशेष एक्सप्रेस सोडण्याचे नियोजन केले आहे.  सीएसएमटी ते करमळी एक्सप्रेस सोमवार व गुरुवार वगळून  आठवड्यातून ५ दिवस धावेल. तर, सीएसएमटी ते मंगळुरू जंक्शनच्या दैनिक सुपरफास्ट विशेष एक्सप्रेस दररोज धावण्याचे नियोजन केले आहे.

मुंबई परिसरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

02119 सुपरफास्ट तेजस विशेष एक्सप्रेस 20 डिसेंबरपासून पुढील सूचना मिळेपर्यंत सोमवार आणि गुरुवार वगळता आठवड्यातून ५ दिवस सीएसएमटी येथून सकाळ 5.50 वाजता सुटेल.ही एक्सप्रेस त्याच दिवशी करमळी येथे दुपारी २ वाजता पोहचेल. 
02120 सुपरफास्ट तेजस विशेष 20 डिसेंबरपासून पुढील सूचना मिळेपर्यंत सोमवार आणि गुरुवार वगळता आठवड्यातून ५ दिवस करमळी येथून दुपारी 2.40 वाजता सुटेल. सीएसएमटी येथे रात्री 11.15 वाजता पोहोचेल. या गाडीला  दादर, ठाणे, पनवेल, चिपळूण, रत्नागिरी आणि कुडाळ या स्थानकावर थांबा देण्यात येणार आहे. 
01133 सुपरफास्ट विशेष 20 डिसेंबरपासून पुढील सूचना मिळेपर्यंत सीएसएमटी येथून दररोज रात्री  10.02 वाजता सुटेल आणि मंगळुरू जंक्शनला दुसर्‍या दिवशी दुपारी 01.05 वाजता पोहोचेल. 
01134 सुपरफास्ट विशेष 21 डिसेंबरपासून पुढील सूचना मिळेपर्यंत मंगळुरू जंक्शन  येथून दररोज दुपारी २ वाजता सुटेल आणि सीएसएमटी येथे दुसर्‍या दिवशी पहाटे 
04.35 वाजता पोहोचेल. या गाडीला ठाणे, पनवेल, रत्नागिरी, कणकवली, करमळी, मडगाव, कारवार, कुमटा, भटकळ, मुकांबिका रोड बेंदूर, कुंडापुरा, उडुपी आणि सुरथकल या स्थानकावर थांबा देण्यात येणार आहे.

CSMT to Karmali and Mangalore Special Express Will run five days a week

-------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image