उल्हासनगर : विधवा महिलेला ठार मारणारा प्रियकर गजाआड | Ulhasnagar crime update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

culprit arrested

उल्हासनगर : विधवा महिलेला ठार मारणारा प्रियकर गजाआड

उल्हासनगर : विधवा महिलेला ठार मारणाऱ्या तरुणाच्या मुसक्या विठ्ठलवाडी पोलिसांनी (Vitthalwadi police) इगतपुरी रेल्वेस्थानकातून आवळल्या आहेत. दुसऱ्या प्रवाशांच्या मोबाईलवरून फोन करणाऱ्या आरोपीचा लाईव्ह लोकेशनवरून (Live location) पाठलाग करून त्याला गजाआड करण्याची कामगिरी पोलिसांनी बजावली आहे. सुकन्या आव्हाड ही महिला चिंचपाडा परिसरात मुलांसोबत राहत होती. १५ मार्चला अनिल आणि सुकन्या यांच्यात पैशांवरून वाद (Money disputes) निर्माण झाले आणि अनिलने सुकन्याला बेदम मारहाण करून तिचे डोके भिंतीवर आपटून गंभीर जखमी केले.

हेही वाचा: मुंबई विद्यापीठाने लोकशाहीर अण्णा भाऊंना डावलले; साहित्यिक, कलावंतांमध्ये नाराजी

रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यापूर्वीच सुकन्याचा मृत्यू झाला. फरारी झालेला आरोपी अनिलकडे मोबाईल नसल्याने तो विविध रेल्वेस्थानकांवर प्रवाशांना माझा फोन चोरला, असे सांगून त्यांच्या फोनवरून भावाला फोन करत असे. अशातच अनिलने एका प्रवाशाच्या फोनवरून त्याच्या भावाशी संपर्क साधला. अनिल हा रेल्वेमध्ये असल्याचे लाईव्ह लोकेशन मिळताच पोलिसांनी कारमधून इगतपुरी गाठून अनिलला ताब्यात घेतले.

Web Title: Culprit Anil Arrested By Vitthalwadi Police In Woman Murder Case Ulhasnagar Crime Update

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :murder casecrime update
go to top