धारावी पुनर्विकासासाठी नव्याने निविदा मागविणार; सध्याची निविदा प्रक्रीया मंत्रिमंडळ बैठकीत रद्द

सुमित बागुल
Thursday, 29 October 2020

आज महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा करून निर्णय घेण्यात आलेत.

मुंबई : आज महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा करून निर्णय घेण्यात आलेत. याताईलाच एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबतचा. धारावी पुनर्विकास प्रकल्पाची सध्याची निविदा प्रक्रीया रद्द करून आता नव्याने निविदा मागविण्याबाबत आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.

महत्त्वाची बातमी : 50 टक्के शिक्षकांना तात्काळ कामावर रूजू होण्याचे आदेश, अध्यादेश गोंधळाचा असल्याचा मुख्याध्यापकांचा आरोप

धारावी प्रकल्पाचा विकास करण्यासंदर्भात 16 ऑक्टोबर 2018 रोजी मंत्रिमंडळाने निर्णय घेतला होता. त्यानुसार सध्या सुरू असलेली धारावी पुनर्विकासाची निविदा प्रक्रीया रद्द करण्याबाबत सचिव समितीने निर्णय घेतला होता.  या निविदेच्या अटी आणि शर्थींमध्ये योग्य त्या फेर दुरुस्त्या करून नव्याने निविदा मागविण्याबाबत सचिव समितीचा निर्णय आज कायम करण्यात आला.

महत्त्वाची बातमी : मुंबई पालिकेला 34 कोटींचा दंड, राष्ट्रीय हरीत लवादाचे निर्देश

या प्रस्तावाच्या अंमलबजावणीत काही फेरबदल करावयाचे झाल्यास मंत्रिमंडळाची मान्यता घेण्यात येणार आहे. धारावी पुनर्विकासाबाबत 2 निविदादारांच्या निविदा सचिव समितीसमोर ठेवण्यात आल्या होत्या.  या प्रकल्पासाठी रेल्वेच्या जागेच्या हस्तांतरणाबाबत मुद्दा उपस्थित झाला होता. महाधिवक्ता यांनी दिलेल्या अभिप्रायावर सचिव समितीने निर्णय घेऊन ही निविदा प्रक्रीया रद्द करण्याचे ठरविले होते. 

current tender process is cancelled by state cabinet new tender process will start


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: current tender process is cancelled by state cabinet new tender process will start