सायबर भामटेगिरीला आलाय ऊत, 'या' पाच गोष्टींनी तुमची होऊ शकते फसवणूक...

सायबर भामटेगिरीला आलाय ऊत, 'या' पाच गोष्टींनी तुमची होऊ शकते फसवणूक...

मुंबई - जगभरात कोरोनाचं सावट आहे. उद्योगधंदे, विमान कंपन्या, व्यवसाय आणि आतिथ्य क्षेत्र म्हणजेच हॉस्पिटॅलिटी क्षेत्र हे अजून पूर्णतः सुरु होण्यास आणखीन किती दिवस लागतील हे आत्ता कुणालाच आतातरी सांगता येणार नाही. आपल्यापैकी अनेकजण कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी घरातून काम करत आहोत. घरून काम करण्यासाठी लोकं क्लाऊड-आधारित रिमोट कनेक्टिव्हिटीचा वापर करून घरून काम करतायत. मात्र याचे काही धोके आता समोर येतायत. ऑफिसमध्ये काम करताना आपल्या कंपनीचा डेटा हा अत्यंत सुरक्षित ठेवला जातो, त्यासाठी अनेक पर्याय वापरले जातात. मात्र सध्याच्या स्थितीत सायबर सुरक्षा हा देखील एक महत्त्वाचा विषय आता समोर येतोय.

सध्या इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात कोरोना व्हायरस, त्यावरील उपचार, कोरोनाचे मृत्यू, कोरोना होऊ नये म्हणून काय काळजी घायला हवी, याबाबत मोठ्या प्रमाणात सर्च केला जातोय. अशात लोकांमधील याच भीतीचा सायबर गुन्हेगारांकडून फायदा उचलण्याचा प्रयत्न केला जातोय. यासंदर्भात एक अहवाल समोर आलाय, यामध्ये कोरोना जेवढा झपाट्याने जगभरात वाढतोय तेवढ्याच झपाट्याने लोकांमध्ये त्याबद्दलची भीती वाढताना पाहायला मिळतेय. अशात सायबर गुन्ह्यांचं प्रमाण देखील वाढत राहील असं बोललं गेलंय. 

ऍटलास VPN कंपनेने केलेल्या अध्ययनानुसार एक धक्कादायक आकडेवारी समोर आलीये. यामध्ये कोरोना लॉकडाऊन काळात फिशिंग वेबसाईट्सच्या संख्येत तब्बल ३५० टक्के वाढ झालीये. गुगलने देखील याबाबत अहवाल प्रसिद्ध केलाय. ज्यामध्ये  गेल्या तीन महिन्यात नोंदणीकृत फिशिंग वेबसाईट्सच्या संख्येत वाढ झाल्याचं नमूद करण्यात आलंय. जानेवारी महिन्यात गुगलवर 149,195 स्पॅम आणि फिशिंग वेबसाईटची नोंद होती, जी आता वाढून  522,495 वर गेलीये. केवळ दोन महिन्यात ही संख्या तब्बल ३५० पटीने वाढलीये. 

सध्या मोठया प्रमाणात लोकं घरातून VPN द्वारा आपल्या कंपनीच्या नेटवर्कशी जोडले जाऊन काम करतायत. याचाच फायदा हे सायबर भामटे उचलू शकतात. अशात कंपन्यांकडून आपल्या कर्मचाऱ्यांना संभाव्य सायबर धोक्यांची माहिती देणं गरजेचं आहे. यामध्ये सायबर भामट्यांकडून नक्की काय केलं जाऊ शकतं, कशा प्रकारे भामटे तुमच्या लॅपटॉपमध्ये शिरून ऑफिसचा डेटा चोरू शकतात, कोणत्या लिंक्सवर क्लिक करावं किंवा करू नये, याबाबत माहिती दिली गेली पाहिजे. एकाद्या चुकीमुळे सायबर भामट्यांकडून ऑफिसचा गुप्त डेटा चोरला जाऊ शकतो.  

कशा प्रकारे भामटे लोकांच्या भीतीचा फायदा घेतलाय 

ट्रिक नंबर १ 

सध्या सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातायत. यामध्ये नागरिकांना टॅक्सची  सूट असेल, मासिक हफ्त्यांमधून सूट देणं असो यासारख्या अनेक योजनांचा फायदा घेऊन खोटी माहिती पसरली जातेय. यामध्ये खोट्या लिंक्स पाठवून अनेकांची दिशाभूल केली जातेय. त्यामुळे अशा गोष्टींपासून सावधानता बाळगायलाच हवी.   

ट्रिक नंबर २ 

अनेक लोकं पहिल्यांदाच घरून काम करतायत. अशात ऑफिसच्या IT टीमकडून अनेकांना याबाबत माहिती दिली जाते. यासाठी वारंवार फोनवरून संभाषण साधून याबाबत माहिती दिली जातेय. अशात याच गोष्टीचा फायदा घेऊन भामटेगिरी होऊ शकते. तुम्हाला आलेला फोन कॉल हा तुमच्याच ऑफिसमधून आलाय की नाही याच खात्री झाल्याशिवाय कोणतीही माहिती देऊ नका, याचसोबत समोरून दिलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. 

ट्रिक नंबर ३

तुम्हाला लुटण्यासाठी अनेक प्रकारचे इमेल पाठवले जातात. यामध्ये लोकांना घाबरवण्यासाठी “reset password” किंवा “business continuity” असे शब्द वापरले असतात. याचसोबत काही लोकप्रिय टेलीकॉन्फरन्सिंग प्लॅटफॉर्मची देखील कॉपी बनवून तुम्हाला लुटलं जाऊ शकतं. 

ट्रिक नंबर ४

WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेकडून किंवा त्यांच्या नावाचा गैरवापर करून खोटे मेल पाठवून लोकांना लुटण्याचे प्रकार सुरु आहेत. तुम्हाला काही माहिती हवी असल्यास WHO च्या अधिकृत वेबसाईटवर याबाबत माहिती घेता येईल. 

ट्रिक नंबर ५

अनेकदा आपण माहिती घेण्यासाठी इंटरनेटवर सर्च करत असतो. यासाठीआपण अधिकृत वेबसाईटवर जाणं पसंत करतो. मात्र काही अशा देखील लिंक्स असतात ज्या तुम्हाला प्रथमदर्शनी त्या खऱ्या आणि अधिकृत दिसतात. मात्र त्यावरून माउस फिरवल्यास त्यांचा खरा वेब address आपल्याला समजू शकतो. अशा लिंक्सवर केली केल्यास कोणत्याही अधिकृत संकेतस्थळावर न नेता इंटरनेट आल्याला खोट्या साईवर घेऊन जातो. अशा वेबसाईटवर कोणतीही माहिती टाकू नका.

सध्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीती आहे याचसोबत अनेक लोकांकडून मदतीचा ओघ देखील सुरु आहे. अशात मोठ्या प्रमाणात सायबर भामटेगरी गुरु आहे. त्यामुळे सतर्क राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे.   

cyber threat increased during pandemic corona virus crisis read tricks used by hackers  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com