घाटकोपरमध्ये झाडाच्या फांद्या कोसळल्या; दुचाकी वाचल्या

मुंबईत जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस
Ghatkopar
GhatkoparPhoto by Nilesh More

घाटकोपर (मुंबई): केरळ, कर्नाटकपाठोपाठ तौक्ते चक्रीवादळाचा (Cyclone Tauktae) तडाखा रविवारी महाराष्ट्र (Maharashtra) आणि गोवा (Goa) या राज्यांना बसला. अरबी समुद्रात (Arabian Sea) निर्माण झालेल्या तौत्के चक्रीवादळाने भीषण रुप धारण केले. हे वादळ आता हळूहळू गुजरातच्या (Gujarat) दिशेने जात आहे. रविवारी रात्री नऊ वाजल्यापासूनच या चक्रीवादळाचा परिणाम मुंबईत जाणवू लागला. वादळ पुढे सरकलं तसे-तसे मुंबईत जोरदार वारे (Windy Weather) वाहू लागले. सोमवार सकाळपासून तर मुंबईत (Mumbai) वादळी वाऱ्यासह पावसालाही (Heavy Rainfall) सुरूवात झाला. या वाऱ्यामुळे घाटकोपरमध्ये झाडांच्या फांद्या कोसळल्या, पण सुदैवाने दुचाकींचे (Two Wheelers) नुकसान टळले. (Cyclone Tauktae Trees Fallen as heavy rainfall and wind in Mumbai Ghatkopar fortunately parked bikes are safe)

Ghatkopar
मुंबई: तरूणाला विनामास्क पकडलं अन् पोलिसांना बसला धक्का

तौक्ते चक्रीवादळाचा मुंबई किनारपट्टीसह शहरांना मोठा फसका बसला. 80 ते 85 किमी ताशी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याच्या तडाख्यात अनेक ठिकाणी झाडे कोसळली. पोलिसांसह पालिकेकडून नागरिकांना 'घराबाहेर पडू नका', असे आवाहन करण्यात आले आहे. सोमवारी सकाळपासून मुंबईत वेगाने वाहणाऱ्या पावसात झाडांच्या मोठमोठ्या फांद्या उन्मळून खाली कोसळल्या. घाटकोपर पश्चिमेकडील जगदुशा नगर येथील झाडाची मोठी फांदी सकाळी 9 च्या सुमारास कोसळली. ही फांदी रस्त्यावर पार्क केलेल्या दुचाकींवर पडली. पण सुदैवाने दुचाकीचे कोणतेही नुकसान झाले नाही.

(संपादन- विराज भागवत)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com