अर्नाळा: बोटी किनाऱ्याला आदळून लाखोंचे नुकसान

अर्नाळा: बोटी किनाऱ्याला आदळून लाखोंचे नुकसान
Summary

मच्छिमार बांधव हवालदिल; दिसलं हृदयद्रावक चित्र

वसई (मुंबई): प्रचंड जोराने (Cyclone Tauktae) वारा वाहत असल्याने अर्नाळा (Arnala) समुद्रकिनारी नांगरून ठेवलेल्या बोटींचे दोर तुटले आणि किनाऱ्याला धडकून अनेक बोटींचे प्रचंड नुकसान झाले. सध्या मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सुमारे 8 ते 10 बोटींचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. अर्नाळा येथील मच्छीमार बांधवाना (Fishermen) सतर्कतेचा इशारा देण्यात आला. मात्र आपल्या जीवाइतक्याच महत्त्वाच्या असलेल्या बोटींचे नुकसान )Broken Boats) झाल्याने मच्छिमार आणि स्थानिक नागरिक हवालदिल झाल्याचे विदारक चित्र (Emotional Picture) पाहायला मिळाले. (Cyclone Tauktae Vasai Virar Arnala boats broken after hitting to the coast emotional picture)

सकाळच्या युट्युब चॅनेल पाहण्यासाठी येथे क्लिक करा

वसई विरार शहरात समुद्रकिनारा आहे. अर्नाळा येथील मच्छीमारांच्या सुमारे शेकडो बोटी समुद्रात खोल मासेमारीसाठी जातात मात्र चक्रीवादळामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली असून संपूर्ण किनाऱ्यावर आपत्तकालीन नियंत्रण पथक लक्ष ठेवून आहे. सर्व बोटी या किनाऱ्याला लावण्यात आल्या आहेत.यातच सकाळी जोरदार वारा सुरु झाल्याने मोठ्या दोराला बांधलेल्या 8 ते 10 बोटी या प्रचंड वाऱ्यामुळे दोर तुटून किनाऱ्यावर आदळल्या यात बोटीच्या साहित्याची वाताहत झाली.एका बोटींसाठी सर्वसाधारण अडीच लाख इतका खर्च येतो. झालेले नुकसान पाहता बोट मालकांना नव्याने बोटी तयार करण्यासाठी लाखोंचा खर्च करावा लागणार असल्याने ते हवालदिल झाले आहेत.अर्नाळा किल्ल्यात असलेल्या या बोटींचा पंचनामा करून आम्हाला नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी मच्छीमार बांधव करत आहेत.

अर्नाळा: बोटी किनाऱ्याला आदळून लाखोंचे नुकसान
Video: मरीन ड्राइव्हवर दिसलं समुद्राचं रौद्र रूप

अर्नाळा किल्ला येथे समुद्रकिनारी असलेल्या बोटींना जिरदार वाऱ्याचा तडाखा बसला यात बोटींचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शासन व स्थानिक प्रशासनाने याबाबत दखल घेऊन तात्काळ पंचनामे करावे जेणेकरून नुकसान भरपाई मिळेल.

-निनाद पाटील, ग्रामस्थ, अर्नाळा

(संपादन- विराज भागवत)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com