अरबी समुद्रात वादळ, BMC ICU मधील ३९५ रुग्णांना हलवणार

जनरेटरची सोय करुन ठेवण्याचे निर्देश
Covid Center
Covid Centeresakal

मुंबई: अरबी समुद्रात (arbian sea) घोंगावत असलेल्या वादळामुळे (cyclone threat) रविवारी मुंबईत वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर कोविड केंद्राच्या (covid center) अतिदक्षता विभागात असलेल्या 395 रुग्णांचे स्थालांतर करण्याचा निर्णय महानगर पालिकेने घेतला आहे. तसेच, सर्व रुग्णालयांना जनरेटरची सोय करुन ठेवण्याचे निर्देश अतिरीक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिले आहेत. (cyclone threat bmc will shift 395 covid patients from icu)

निसर्ग वादळामुळे गेल्या वर्षी 3 जून ला वांद्रे कुर्ला संकुलातील कोविड केंद्रात पाणी भरले होते. तसेच,काही भागात गळतीही झाली होती.यावेळी महानगर पालिकेने पुर्व तयारी करुन ठेवण्यास सुरवात केली आहे. सावधानतेचा उपाय म्हणून वांद्रे-कुर्ला संकुल व दहिसर येथील जंबो कोविड सेंटरमधील अतिदक्षता विभागातील रुग्णांसह 395 रुग्णांचे स्थानांतरण हे पालिकेच्या व राज्य सरकारच्या रुग्णालयांमध्ये करण्यात येणार आहे. सेव्हन हिल्स रुग्णालय, नेस्को जंबो कोविड सेंटर, लोकमान्य रुग्णालय, ट्रॉमा केअर रुग्णालय, सेंट जॉर्ज रुग्णालय येथे करण्यात येणार आहे.अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

Covid Center
कोरोनाचा कहर, पनवेलमध्ये सहा आठवड्यात ३४० मृत्यू

वादळी वाऱ्यांमुळे विज पुरवठा खंडीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विज पुरवठा खंडीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सर्व रुग्णालयांना जनरेटर सज्ज ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे.तसेच जनरेटसाठी आवश्‍यक असलेला इंधनसाठाही करुन घ्यावा असेही निर्देश देण्यात आले.

Covid Center
"सैरभैर चंद्रकांत पाटील यांना मानसिक उपचारांची गरज"

किनाऱ्यांवरील वस्त्यांना सतर्कतेचा इशारा

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकासह नौदल,तटरक्षक दल आणि भुदला सोबत गरज वाटल्यास संपर्क साधण्यात आला आहे.त्याच बरोबर सर्व समुद्र किनाऱ्यांवर नागरीकांना जाण्यास मनाई करण्यात आली आहे.तसेच,पाणी तुंबण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी पाणी उपसणारे पंप तयार ठेवण्यात येणार आहेत. किनाऱ्यांवरील वस्त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com