Mumbai : सायरस मेस्त्रींच्या अपघाताची मानवाधिकार आयोगाने घेतली दखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Cyrus Mistry Accidental Death

Cyrus Mistry Death : सायरस मेस्त्रींच्या अपघाताची मानवाधिकार आयोगाने घेतली दखल

मुंबई : मुंबई - अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर मध्ये झालेल्या सायरस मिस्त्री यांच्या अपघाताची दखल मानवाधिकार आयोगाने घेतली असून, शुक्रवारी (ता.14)राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव, परिवहन सचिव, आयुक्त आणि संबंधीत अधिकारी आणि एनएचएआयच्या अधिकाऱ्यांना हजर राहण्याच्या सुचना करण्यात आल्या होत्या, दरम्यान अपघाता संदर्भातील आपले म्हणने सहा आठवड्याच्या आत मांडण्याचे आदेश मानवाधिकार आयोगाने दिले आहे.

सायरस मिस्री यांच्या गंभीर अपघातानंतर वाहनांमध्ये सुरक्षेच्या यंत्रणेचे विविध मुद्दे पुढे आले आहे. चालकांशीवाय आता मागच्या प्रवाशांना सुद्धा सिटबेल्ट अनिवार्य करण्याची शक्यता सुद्धा व्यक्त केली जात आहे. यादरम्यान आता मानवाधिकार आयोगाने सुद्धा या गंभीर अपघाताची दखल घेत यामधील चुकांची विचारणा केली आहे. 14 आॅक्टोंबर रोजी परिवहन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, एनएचएआय च्या अधिकाऱ्यांना हजर राहण्याचे आदेश दिले होते त्यावरून संबंधीत अधिकारी हजर सुद्धा झाले.

मात्र, या अपघातांशी संबंधीत अधिक काही अधिकारी, कर्मचाऱ्यांना मानवाधिकार आयोगाच्या नोटीस जाण्याची शक्यता असून, याप्रकरणात सहा आठवड्यात खुलासे सादर करण्याच्या सुचना मानवाधिकार आयोगाने दिल्या आहे. 6 आठवड्यानंतर पुन्हा मानवाधिकार आयोगाच्या कार्यालयात अपघाताशी संबंधीत अधिकाऱ्यांना उपस्थित राहावे लागणार आहे.