डबेवाल्यांना तातडीने घरे मिळावीत - अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

मुंबईच्या डबेवाल्यांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत हक्काची घरे उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, तसेच त्यांच्या मुंबई डबेवाला भवनाचा प्रश्नही तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी दिले.

मुंबई - मुंबईच्या डबेवाल्यांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत हक्काची घरे उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, तसेच त्यांच्या मुंबई डबेवाला भवनाचा प्रश्नही तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी दिले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मुंबईतील डबेवाल्यांकरिता घरबांधणी, मुंबई डबेवाला भवन तसेच अन्य मागण्यांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील, अपर मुख्य सचिव संजय कुमार आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, ‘‘मुंबईतील डबेवाल्यांच्या कौशल्याचे जगभरात कौतुक होते. त्यांच्या घरांचा प्रश्न सोडविण्यासाठी सरकार गेल्या वर्षांपासून प्रयत्नशील आहे. त्यासाठी योग्य ती कार्यवाही तातडीने सुरू करावी.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dabewale need to get homes immediately Ajit Pawar