

Tech Leap: 34-Year-Old Panel Signaling Replaced with Siemens Westrace MK-II at Dadar
Sakal
मुंबई : मुंबईतील सर्वाधिक वर्दळीच्या आणि महत्त्वाच्या स्थानकांपैकी एक असलेल्या दादर रेल्वे स्थानकावर सिग्नल यंत्रणेचे मोठे आधुनिकीकरण करण्यात आले आहे. मुंबई उपनगरी रेल्वेच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत येथे ३४ वर्षे जुनी सिग्नल यंत्रणा बदलून अत्याधुनिक सिमेन्स वेस्ट्रेस एमके-२ इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली यशस्वीरीत्या कार्यान्वित करण्यात आली. पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे आणि आगामी मेट्रो मार्गांना जोडणाऱ्या या महत्त्वाच्या स्थानकावरील या बदलामुळे रेल्वे वाहतूक अधिक सुरक्षित, वेगवान आणि सुरळीत होणार असून दररोज प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना त्याचा थेट लाभ मिळणार आहे.