
धारावी नंतर दादर विभागाची ही कोरोनामुक्तीने वाटचाल सुरू झाली असून आज दादर मध्ये आज एकही नवा रुग्ण सापडला नाही
मुंबई : धारावी नंतर दादर विभागाची ही कोरोनामुक्तीने वाटचाल सुरू झाली असून आज दादर मध्ये आज एकही नवा रुग्ण सापडला नाही. त्यामुळे दादरवासीयांनी सुटकेचा निश्वास सोडला. दादर मधील एकूण रुग्ण संख्या ही 4,750 इतकी आहे. तर 102 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. माहीम मध्ये ही आज 7 नवीन रुग्णांची भर पडली असून रुग्णांची संख्या 4,568 इतकी झाली आहे. तर 209 एक्टीव्ह रूग्ण आहेत.
मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा
धारावीमध्ये आज दिवसभरात 1 नविन रूग्ण सापडले असून एकूण रूग्णसंख्या 3,789 इतकी झाली आहे. तर 13 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जी उत्तरमध्ये आज 8 नविन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. तर धारावी,दादर,माहिम परिसराचा समावेश असणा-या जी उत्तर विभागातील रुग्णांचा एकूण आकडा 13,107 वर पोहोचला आहे. तर 324 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जी उत्तरमध्ये आतापर्यंत 659 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. धारावीमध्ये 3,464,दादरमध्ये 4,475 तर माहीम मध्ये 4,215 असे एकूण 12,154 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
---------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )