दादर सेना भवन येथे जल वाहिनी फुटली; शेकडो लिटर पाणी गेले वाया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

waterline leakage

दादर सेना भवन येथे गुरुवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ५७ इंचाची जल वाहिनी फुटली.

दादर सेना भवन येथे जल वाहिनी फुटली; शेकडो लिटर पाणी गेले वाया

मुंबई - दादर सेना भवन येथे गुरुवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ५७ इंचाची जल वाहिनी फुटली. पालिकेच्या जी उत्तर विभागाच्या जल विभागाला माहिती मिळताच तात्काळ दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती पालिकेच्या जी उत्तर विभागाचे असिस्टंट इंजिनिअर कैलास डोंगाडे यांनी दिली. ही भूमीगत पाण्याची गळती झाल्याचे सांगत त्यांनी या गळतीचा पाणी पुरवठ्यावर कोणताही परिणाम झाला नसल्याचे सांगितले. तसेच जी नॉर्थ आणि जी साऊथ या दोन्ही भागातील पाणी पुरवठा सुरळीतपणे होणार असल्याचे त्यांच्याकडे सांगण्यात आले.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांपैकी तानसा जल वाहिनीतून दररोज ४५५ दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होतो. यात दक्षिण मुंबईतील अनेक भागात या धरणातील पाणी पुरवठा होतो. गुरूवारी वाहिनी फुटल्याने शेकडो लिटर पाणी वाया गेले. दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने रात्री उशिरापर्यंत दादर परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :dadarwater pipe line