esakal | पावसाळ्यात दहिसरला पूराचा धोका; मेट्रोने अद्याप पूर्ण नाही केले काम
sakal

बोलून बातमी शोधा

dahisar

पावसाळा तोंडावर आला असतानाही दहिसर नदीच्या पात्रात गाळ, दगड-मातीचा भराव तसाच आहे. महापालिका व मुंबई मेट्रोने भराव न काढल्यामुळे पावसाळ्यात नदीच्या प्रवाहात अडथळा येऊन काठालगतच्या भागांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. 

पावसाळ्यात दहिसरला पूराचा धोका; मेट्रोने अद्याप पूर्ण नाही केले काम

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : पावसाळा तोंडावर आला असतानाही दहिसर नदीच्या पात्रात गाळ, दगड-मातीचा भराव तसाच आहे. महापालिका व मुंबई मेट्रोने भराव न काढल्यामुळे पावसाळ्यात नदीच्या प्रवाहात अडथळा येऊन काठालगतच्या भागांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. 

मोठी बातमी ः पालघरसह डहाणूत 'निसर्ग' वादळाचे संकट; प्रशासनासह 'एनडीआरएफ' सतर्क

मुंबईतील नद्या आणि नाल्यांच्या सफाईचे काम युद्धपातळीवर सुरू असले, तरी दहिसर नदीच्या पात्रात महापालिका आणि मुंबई मेट्रोच्या विकासकामांचा भराव पडून आहे. पावसाचे दिवस आले असतानाही नदीच्या पात्रातील भराव काढण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक रहिवासी करत आहेत.

मोठी बातमी ः पीएम केअर्स निधीबाबत भूमिका स्पष्ट करा;  उच्च न्यायालयाचे आदेश

स्थानिक लोकप्रतिनिधींनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह दहिसरमधील नदी आणि नाल्यांची पाहणी केली. या पाहणीदरम्यान नदीपात्रात भराव कायम असल्याचे निदर्शनास आले. अनेक नाल्यांमधील गाळ व दहिसर नदीच्या पात्रातील तातडीने काढण्याचे निर्देश पर्जन्यजल विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

मोठी बातमी ः 1882 च्या विनाशकारी 'द ग्रेट बॉम्बे सायक्लॉन' बद्दलची Inside Story !

मेट्रो, पालिकेचे दुर्लक्ष
दहिसर नदीच्या पात्रात मुंबई मेट्रोसाठी उभारण्यात आलेल्या मार्गाचा खांब आहे. त्यावेळी झालेला भराव नदीच्या पात्रातच पडून आहे. महापालिकेतर्फे नदीवर पूल उभारला जात आहे. त्यामुळे अगदी 100 मीटरच्या क्षेत्रातच या दोन्ही कामांनंतर राहिलेले ढिगारे पडलेले आहेत.

loading image
go to top