पालघरमधील माता-बाल संगोपन केंद्राची इमारत धोकादायक; प्रसूतिगृह, आंतर रुग्णालय कक्ष सुरूच 

प्रकाश पाटील
Sunday, 10 January 2021

पालघर शहरातील जुने ग्रॅंड मेडिकल महाविद्यालय व सर जे. जे. समूह वैद्यकीय महाविद्यालयातर्फे सुरू असलेल्या आणि 72 वर्षे जुनी प्रसूतीगृहाची इमारत संरचनात्मक परीक्षणामध्ये धोकादायक इमारत ठरवली गेली आहे.

पालघर : पालघर शहरातील जुने ग्रॅंड मेडिकल महाविद्यालय व सर जे. जे. समूह वैद्यकीय महाविद्यालयातर्फे सुरू असलेल्या आणि 72 वर्षे जुनी प्रसूतीगृहाची इमारत संरचनात्मक परीक्षणामध्ये धोकादायक इमारत ठरवली गेली आहे. तरीदेखील या ठिकाणी दर महिन्याला कोरोना काळातसुद्धा 30 ते 40 प्रसूती होत असल्याची माहिती समोर आली आहे. 

 

सध्या आरोग्य पथकाकडून याच धोकादायक इमारतीमध्ये प्रसूतिगृह चालवले जाते, ते 1948 साली बांधलेल्या माता-बाल संगोपन केंद्राची इमारत धोकादायक असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने एका पाहणीत स्पष्ट केले आहे. त्यामुळे मिनी शल्य रुग्णालय स्थापन करण्याऐवजी सध्या अस्तित्वात असलेल्या ग्रामीण रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर 20 खाटांचा नवीन वॉर्ड स्थापन करण्याचा प्रयत्न प्रशासकीय पातळीवर केला जात आहे. याच विभागाकडे अस्तित्वात असलेल्या प्रशिक्षणार्थी डॉक्‍टरांच्या निवासी इमारतीची दुरुस्ती व डागडुजी करून त्या ठिकाणी हे प्रसूतिगृह स्थलांतरित करण्याचे प्रस्तावित आहे. या कामासाठी तीन कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली असली तरीदेखील बजेटमध्ये हे काम मंजूर नसल्याने दुरुस्तीचे काम खोळंबून राहिले आहे. असे असले तरी धोकादायक इमारतींमध्ये दंत चिकित्सा, लसीकरण, एनसी क्‍लीनिक तसेच प्रसूतिगृह सुरू ठेवणे गरजेचे झाले आहे. 
जिल्ह्यातील रुग्णांची सोय व्हावी, तसेच आरोग्य सुविधांचा दर्जा उंचाविण्यासाठी वैद्यकीय

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

शिक्षण विभागाकडे असलेल्या ग्रॅन्ट वैद्यकीय महाविद्यालय व सर जे. जे. समूह रुग्णालय संचालित पालघर आरोग्य पथकाच्या जागेमध्ये, तसेच या विभागाकडे असलेल्या मनुष्यबळाला सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ग्रामीण रुग्णालय क्षेत्र व मनुष्यबळाची सांगड घालून एकत्रितपणे मिनी सिव्हील (शल्य) रुग्णालय स्थापन करण्याचे विचाराधीन होते

Dangerous building of mother and child care center in Palghar Maternity

----------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dangerous building of mother and child care center in Palghar Maternity