Mumbai News : दापोली रिसॉर्ट प्रकरण; सदानंद कदम यांचा सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला

दापोली रिसॉर्ट प्रकरणी सदानंद कदम यांचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला आहे.
court
courtsakal

मुंबई - दापोली रिसॉर्ट प्रकरणी सदानंद कदम यांचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला आहे. सदानंद कदम हे शिवसेना (ठाकरे) गटाचे नेते अनिल परब यांचे फ्रंट मॅन म्हणून वावरत होते. दापोली रिसॉर्टचे अनाधिकृत बाधकाम अधिकृत करण्यासाठी ते स्थानिक अधिकाऱ्यांना धमकावत होते अशी टिपण्णी कोर्टाने केली आहे.

पीएमएल कोर्टाचे न्यायाधीश एम जी देशपांडे यांनी मंगळवारी(ता. १०) हा निर्णय दिला. न्यायालयाच्या आदेशाची प्रत बुधवारी उपलब्ध झाली. सदानंद कदम हे अनाधिकृत कामाला अधिकृत करण्याचे काम करत होते. पीएमएलये कायद्याचा कलम ३ अंतर्गत हा मनी लॉडंरीगचा गुन्हा आहे. दापोली एसडीओ आणि ग्रामपंचायत ही अनिल परब आणि सदानंद कदम यांच्या दबावाखाली काम करत होती.

त्यांच्यापुढे मान झुकवण्याशिवाय त्यांना काही पर्याय नव्हता असेही या आदेशात म्हटले आहे. मुळात अकृषी वापरासाठी दिलेल्या परवानगीवर प्रश्नचिन्ह आहे.मनी लॉंडरीग प्रकरणात सहभाग नसल्याचा कुठलेही स्पष्टीकरण आरोपी देवू शकले नाही, असेही कोर्टाने आपल्या आदेशात म्हटले आहे.

दापोली रिसॉर्ट बांधकाम प्रकरणी सदानंद कदम यांना मार्च २०२३ मध्ये अटक करण्यात आली. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.दापोली रिसॉर्ट बांधताना सीआरझेड नियमाचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. आयकर खात्याने दापोली रिसॉर्ट जप्त केला आहे. या रिसॉर्टशी मालकी बेकादेशीरपणे सदानंद कदम यांच्याकडे हस्तांतरीत केल्याचा आरोप तपास यंत्रणेने अनिल परब यांच्यावर केला आहे. ईडीने या प्रकरणी स्वतंत्र चौकशी केली आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com