Navratri Festival : ‘गरब्यासाठी डीजेची आवश्यकता नाही’

डीजे किंवा मोठ्या ध्वनिक्षेपक आवाजाची आवश्यकता नाही, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदविले
Navratri festival Mumbai Garba dance
Navratri festival Mumbai Garba dancesakal
Updated on

मुंबई : गरबा आणि दांडिया खेळताना तो पारंपरिक पद्धतीने आयोजित करायला हवा. हा धार्मिक आणि पारंपरिक उत्सव आहे; मात्र त्यासाठी मोठ्या ध्वनिक्षेपक, डीजे किंवा तत्सम आवाजाची आवश्यकता नाही, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदविले आहे.

नागपूरमधील शांतता क्षेत्र असलेल्या मैदानात नवरात्र उत्सव आयोजित करण्याची परवानगी स्थानिक सोसायटीने मागितली होती; परंतु प्रशासनाकडून परवानगी नाकारण्यात आल्यामुळे रहिवाशांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर देवीची आराधना एकाग्रतेने करायला हवी. त्यामध्ये अडथळा येता कामा नये. जे भाविक असतात ते स्वतः आणि इतरांच्या भक्तीत अडथळा किंवा व्यत्यय येणार नाही, याची काळजी घेतात असे नागपूर खंडपीठाने म्हटले आहे.

ज्याठिकाणी याचिकादारांना गरबा आणि दांडिया आयोजित करायचा होता, ते एका शाळेचे मैदान आहे आणि त्याच्यालगत रुग्णालय आहे. त्यामुळे येथील परवानगी सशर्त देण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

MP naresh Mhaske and MP Shrikant Shinde
Anna Bansode
Local Trains Late Every Day Banner Near Kopar Station
csmt railway station
Marathi News Esakal
www.esakal.com