Dasara Melava 2023 : दसऱ्याची लढाई डोंबिवलीमध्ये ! शिंदे ठाकरे गटाची बॅनरबाजी; ताकद मोठी दाखविण्याचा प्रयत्न

शिवसेनेचा दसरा मेळावा शिंदे ठाकरे गटाचे डोंबिवलीत शक्ती प्रदर्शन
Dasara Melava 2023
Dasara Melava 2023Sakal
Updated on

डोंबिवली - राज्यातील सत्ता बदलानंतर दसरा मेळाव्याच्या माध्यमातून शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट आपापले शक्ती प्रदर्शन करतात. याच पार्श्वभूमीवर डोंबिवली मध्ये बॅनरबाजी करत दोन्ही गटाने आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. शिंदे गटाने "शिवसेनेचे एकच तत्व साहेबांचे हिंदुत्व साहेबांचे शिष्यत्व', शिवसेना ह्या शब्दासाठी अभिमानी हिंदुत्वासाठी" अशा आशयाचे बॅनर शहरात रविवारी झळकवले.

याला तोड म्हणून ठाकरे गटाने देखील रातोरात याच बॅनरच्या बाजूला बॅनर बाजी करत "निष्ठावंतांचा दसरा मेळावा, धगधगत्या मशालीचा, धगधगता विचार" अशा आशयाचे बॅनर लावले आहेत. दोन्ही गटाने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत आपल्या नेत्याचे फोटो बॅनर वर झळकवले असून आमची ताकद मोठी हे दाखविण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिसते.

उद्या दसऱ्याचा सण आहे. दसऱ्याच्या दिवशी अवघ्या महाराष्ट्राच्या नजरा या राजधानी मुंबईकडे असतात. कारण दसऱ्याच्या दिवशी शिवसेनेचा मेळावा पार पडतो. दसरा मेळावा ही शिवसेनेची परंपरा आहे. दसऱ्या मेळाव्याच्या दिवशी होणाऱ्या भाषणाकडे राज्याचं लक्ष लागलेले असतं.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेचे दोन दसरा मेळावे पार पडत आहेत. मुंबईतील शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचा दसरा मेळावा होणार असून येथे उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. तर आझाद मैदानावरून शिंदे हे आपल्या भात्यातून बाण सोडणार आहेत.

दसरा मेळाव्याला आपली ताकद दाखविण्यासाठी शिंदे व ठाकरे गटाकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. त्यानिमित्ताने शहरात दोन्ही गटाकडून बॅनर लावत शक्तीप्रदर्शन करण्यास सुरुवात झाली आहे. डोंबिवलीतील इंदिरा गांधी चौकात शिवसेना शिंदे व ठाकरे गटाकडून बॅनर बाजी करण्यात आली आहे.

या बॅनर वर हिंदुहृदयसम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे, दिवंगत आनंद दिघे आणि त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो झलकवण्यात आले आहेत. त्याच बाजूला ठाकरे गटाकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे.

त्यावर देखील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे व माजी उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे फोटो झळकवण्यात आला आहे. असे फोटो लावत आमच्या नेत्यांची ताकद मोठी हेच जणू हे बॅनर दाखवत असल्याची चर्चा रंगली आहे. शिंदे गटाचे बॅनर लागताच रातोरात ठाकरे गटाने त्यांच्या दसरा मेळाव्याचे बॅनर लावले आहेत.

बॅनर वर शिंदे गटाकडून "शिवसेनेचे एकच तत्व साहेबांचे हिंदुत्व साहेबांचे शिष्यत्व', शिवसेना ह्या शब्दासाठी अभिमानी हिंदुत्वासाठी" असा संदेश देण्यात आला आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाने त्याला उत्तर स्वरूपात जणू बॅनरबाजी केली आहे. "निष्ठावंतांचा दसरा मेळावा, धगधगत्या मशालीचा, धगधगता विचार" असा संदेश ठाकरे गटाने दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com