Kalyan Jail : आधारवाडी तुरूंगात कैद्यावर दगडांसह पत्र्याच्या बादलीचा वापर करत जीवघेणा हल्ला...7 जणांच्या टोळक्यावर गुन्हा दाखल
Stone Attack : कल्याण आधारवाडी तुरूंगात सात कैद्यांनी एका न्यायबंदीवर दगड आणि पत्र्याच्या बादलीने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात त्या कैद्याच्या डोक्याला व डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे.
डोंबिवली : कल्याण आधारवाडी तुरूंगातील सात कैद्यांनी मिळून रेल्वे सुरक्षा दलातून तुरुंगात आलेल्या एका बंदीवान कैद्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली आहे. दगड आणि पत्र्याच्या बादलीचा वापर करत हा हल्ला करण्यात आला आहे.