मोटरसायकल अन् टॅम्पोच्या अपघातात एकाचा मृत्यू

नंदकिशोर मलबारी
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

सरळगांव (ठाणे) : मुरबाड कल्याण राष्ट्रीय महामार्ग 222 वर अपघाताची मालिका कायम असुन दुपारी एकच्या सुमारास धानिवली टेेक्नोक्रॉप्ट कंपनी समोर मोटरसायकल व 407 टॅम्पोची टक्कर होवुन यात मोटरसायकल स्वार जागीच मरण पावला तर दुसरा गंभीर जखमी असल्याने उपचारा साठी कल्याण येथे खाजगी रुग्णालयात दाखल केल्याचे जखमीच्या नातेवाईकानी सांगितले 
 
याबाबत सविस्तर वृत्त असे कि,  ''राष्ट्रीय महामार्ग 222 वर घोरले गावातुन पेट्रोल पंपावर कामासाठी निघालेले चेतन (सोन्या) हरिचंद्र भोईर( 22) व हरेश पांडुरग भोईर (20) हे धानिवली टेेक्नोक्रॉप्ट कंपनी समोर नविनच असलेली मोटरसायकल व एम. एच 05 आर 9297 ह्या 407 टॅम्पोची टक्कर झाली यात  चेतन हा जागीच मरण पावला तर हरेश हा गंभीर जखमी झाल्याने उपचारासाठी कल्याण येथे नेण्यात आले असल्याचे नातलगानी सांगितले. तर, पुन्हा एकदा सुरक्षेचा उपाय म्हणुन हेल्मेट विषय ऐरणीवर आला आहे.  आपघाताची माहीती मिळताच पोलिस घटना स्थळी हजर झाले. मात्र सध्या राष्ट्रीय महामार्गावर चालणारे भरधाव वहाने व विना हेल्मेट प्रवास जिवघेणा ठरत असल्याचे दिसत आहे. 

Web Title: A death in a motorcycle and a copper accident