संक्रमण नियंत्रणात, मात्र मुंबईतील सर्वाधिक मृत्युदर कमी करण्याचं प्रशासनासमोर आव्हान

समीर सुर्वे
Wednesday, 28 October 2020

देशात सर्वाधिक मृत्यूदर पंजाब राज्यात 3.14 टक्के त्या खालोखाल महाराष्ट्रात 2.63  टक्के आणि गुजरातमध्ये 2.19 टक्के मृत्यूदर आहे.

मुंबई, ता. 28 : मुंबईतील कोविडचे संक्रमण नियंत्रणात असलं तरी मृत्यूदर चिंताजनक आहे. देशात सर्वाधिक मृत्यूदर मुंबईत 4 टक्के इतका आहे. हा मृत्यूदर 1 टक्क्यापर्यंत आणण्याचे आव्हान महापालिकेपुढे आहे. मुंबईतील चार प्रभागांमध्ये मृत्यूदर 5 टक्क्यांहून अधिक आहे. यात, बी सॅडहस्ट रोड प्रभागात मृत्यूदर 6.66 टक्के आहे.

देशात सर्वाधिक मृत्यूदर पंजाब राज्यात 3.14 टक्के त्या खालोखाल महाराष्ट्रात 2.63  टक्के आणि गुजरातमध्ये 2.19 टक्के मृत्यूदर आहे. संपुर्ण देशाचा विचार केल्यास मृत्यूदर 1.50 टक्के आहे. तर जागतिक पातळीवर 2.67 टक्के आहे.

पाच टक्क्यांपेक्षा जास्त मृत्यूदर असलेले प्रभाग ( प्रभाग -  मृत्यूदर टक्क्यात )

  • सॅन्डहर्स्ट रोड - 6.66 %
  • कुर्ला- 5.67 %
  • वरळी, प्रभादेवी - 5.27 %
  • वांद्रे सांताक्रुझ पुर्व - 5.18 %

महत्त्वाची बातमी : आईच्या गर्भाशयातच बाळाला रक्त चढवून दिले जीवनदान, मातेची यशस्वी प्रसूती

मुंबईतील प्रत्येक प्रभागात कोविडचे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 100 दिवसांपेक्षा जास्त आहे. तर, रुग्णवाढीचा वेग 0.50 टक्के आहे. असे असले तरी मृत्यूदर हा देशात सर्वाधिक आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मृत्यूदर 1 टक्क्यांवर आणण्याचे निर्देश दिले आहेत. सप्टेंबर महिन्यांच्या तुलनेने मृत्यूदरात घट झाली आहे. मृत्यूदर अधिक कमी करण्यासाठी रुग्ण वेळीच शोधून त्यांच्यावर तात्काळ उपचार सुरु करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. त्यासाठी कोविड चाचणी केंद्र सुरु करण्यात आले असून चाचण्याची संख्याही वाढविण्यात आली असल्याचे पालिकेच्या एका अधिकार्याने सांगितले.

death rate of corona in mumbai is highest in country which is challenge for BMC


    स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
    Web Title: death rate of corona in mumbai is highest in country which is challenge for BMC