
मुंबई : मुंबईत कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंता कायम आहे. शनिवारी 547 नवे रुग्ण सापडले; त्यामुळे बाधितांचा आकडा 8000 वर पोहोचला. आणखी 27 रुग्ण दगावल्यामुळे मृतांची संख्या 322 झाली आहे.
मुंबईत 547 नवे कोव्हिड-19 पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने बाधितांची संख्या 8172 झाली. शनिवारी 357 रुग्णांची नोंद झाली, तर 190 रुग्ण 29 व 30 एप्रिलला दाखल झाले होते. दगावलेल्या 27 जणांपैकी 20 कोरोनाग्रस्तांना दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 20 पुरुष व 7 महिलांचा समावेश आहे. त्यापैकी 12 रुग्ण 60 वर्षांवरील आणि 15 रुग्ण 40 ते 60 वर्षे वयोगटातील होते. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबळींची संख्या 322 वर गेली आहे. एकूण 481 नवे संशयित रुग्ण सापडले असून, आतापर्यंत 10,995 संशयित रुग्णांना रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे.
137 जण कोरोनामुक्त
कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली, तरी बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. आणखी 137 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, आतापर्यंत 1704 बऱ्या झालेल्या रुग्णांना घरी पाठवण्यात आले आहे. त्यापैकी 145 रुग्ण मुंबईबाहेरून उपचारांसाठी आले होते.
The death toll in Mumbai is over three hundred 27 deaths in one day; 547 new patients
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.