
वज्रेश्वरी : भिवंडी तालुक्यातील महापोली येथे एकाने व्याजासह पैसे दिले तरीही आरोपी आणखीन पैसे उकळत असल्यामुळे व घरच्याना वारंवार धमकी या जाचाला कंटाळून एकाने विष प्राशन करून जीवन संपवलं आहे. कामील शेख असे मृत व्यक्तीचे नाव असून, ही धक्कादायक घटना भिवंडी तालुक्यातील महापोली या गावी घडली आहे या बाबत गणेशपुरी पोलीस ठाण्यात तिघा आरोपी वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.