डेक्‍कन क्‍वीन 88 व्या वर्षात 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 मे 2018

मुंबई - मुंबई-पुणे या दोन प्रमुख शहरांना जोडणारी डेक्कन क्वीन 1 जूनला 88 व्या वर्षात पदार्पण करणार आहे. 1930 मध्ये मध्य रेल्वे मार्गावर ही पहिली डिलक्‍स गाडी धावली होती. 

मुंबई - मुंबई-पुणे या दोन प्रमुख शहरांना जोडणारी डेक्कन क्वीन 1 जूनला 88 व्या वर्षात पदार्पण करणार आहे. 1930 मध्ये मध्य रेल्वे मार्गावर ही पहिली डिलक्‍स गाडी धावली होती. 

सुरुवातीला सात डब्यांसह दोन रॅकने ही गाडी धावत होती. नंतर डब्यांची संख्या 17 वर पोहचली. त्यातील एक रॅक स्कारलेट मोल्डिंगसह चंदेरी रंगात; तर दुसरा रॅक सुवर्ण रेषांसह निळ्या रंगात रंगवण्यात आला. मूळ रॅकच्या डब्याच्या आतील फ्रेम इंग्लंडमध्ये तयार करण्यात आली आहे, तर गाडीचे डब्बे मध्य रेल्वेच्या माटुंगा कारखान्यात तयार झाले. या गाडीच्या प्रथम श्रेणीतील पाच जुने रॅक बदलून धुळमुक्त 65 प्रवाशांसाठी अतिरिक्त जागा करण्यात आली. द्वितीय श्रेणीतील नऊ आसनांऐवजी 120 आसने तयार करण्यात आली. त्यामुळे नव्या रॅकमध्ये 1,417 आसने झाली. तसेच, या गाडीतील भोजनालयात 32 प्रवासी बसू शकतील अशी व्यवस्था आहे. त्यात विविध अत्याधुनिक सुविधाही आहेत. 

Web Title: Deccan Queen to get upgraded coaches