अकरावीचे प्रवेशबाबत लवकरच निर्णय; मंत्री वर्षा गायकवाड यांची महत्वपूर्ण माहिती

तुषार सोनवणे
Tuesday, 3 November 2020

मराठा आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीमुळे राज्यातील शैक्षणिक प्रवेशांबाबत अद्यापही निर्णय झालेला नाही. यापार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्वपूर्ण माहिती दिली आहे.

मुंबई - लॉकडाऊनमुळे राज्यातील शैक्षणिक प्रवेश लांबले आहेत. त्यातच मराठा आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीमुळे राज्यातील शैक्षणिक प्रवेशांबाबत अद्यापही निर्णय झालेला नाही. यापार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्वपूर्ण माहिती दिली आहे.

अमली पदार्थ तस्करांचे धाबे दणाणले; वसई-विरारमध्ये पोलिसांकडून धरपकड सुरू

मराठा आरक्षणामुळे अडकलेल्या अकरावी आणि अन्य शैक्षणिक प्रवेश तत्काळ घ्यावेत. त्यासाठी आरक्षणच्या निकालाची वाट पाहू नये असे वयक्तिक मत मंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले होते. त्यावेळी त्यांनी आपण मंत्री वर्षा गायकवाड आणि उदय सामंत यांच्याशीही चर्चा करणार असल्याचे त्यांनी म्हटले. 

नुकत्याच अकरावी प्रवेशाच्या मुद्यावरून विद्यार्थी पालक समन्वय समितीने राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यावेळी राज यांनी गायकवाड यांना फोन करून याबाबत विचारणा केली होती. त्यावेळी त्यांनी याबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचे म्हटले होते.

मिठागरांच्या जमिनी म्हणजे शिवसेना शाखा नव्हे': आशिष शेलार यांची तिखट टीका

राज्यातील 11 लाख विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेश घेतला आहे. त्यांनी फीसुद्धा भरली आहे. उर्वरित विद्यार्थ्यांचे प्रवेश प्रलंबित आहेत. याबाबत आम्ही कायदेतज्ज्ञांशी बोललो आहे. याप्रकरणी राज्याचे महाधिवक्ता यांचेही मत जाणून घेऊन येत्या दोन दिवसात मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने निर्णय घेतला जाईल, असे मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: decision on the admission of the eleventh says Minister Varsha Gaikwad