कोविड केअर सेंटर्स बंदचा निर्णय दिवाळी नंतर; रुग्णामध्ये वाढ होण्याच्या शक्यतेने BMC सज्ज

कोविड केअर सेंटर्स बंदचा निर्णय दिवाळी नंतर; रुग्णामध्ये वाढ होण्याच्या शक्यतेने BMC सज्ज

मुंबई: दिवाळी नंतर कोविड रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता ध्यानात घेऊन मुंबई महानगर पालिकेने कोणतेही कोविड केअर सेंटर बंद न करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोव्हिड बाबत राज्याच्या टास्क फोर्सचे वरिष्ठ डाॅक्टर, राज्यातील पालिकांचे आयुक्त, वरिष्ठ सरकारी अधिकारी यांच्या सोबत बैठकी नंतर हा निर्णय घेतल्याचा समजत आहे.

दिवाळी नंतर दुसऱ्या लाटेतील भीती लक्षात घेता, मुंबई महानगर पालिका आणि ईतर पालिकांनी देखील रेमेडेसिव्हीर सारख्या लाईफ सेव्हिंग औषधांची मागणी वा़ढवली आहे. तर आक्सिजन पूरवणाऱ्या कंपन्यांना देखील पुरवठा कमी न करण्याच सांगण्यात आले आहे
दुसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता सतर्क रहाण्यची गरज आहे. कोणतंही कोव्हिड सेंटर बंद करण्यात येणार नाही. रुग्णालयांचे डिन हे स्टाफ डिप्लाॅमे़ट आणि शिथीलता देण्याचा निर्णय घेतील, असे अतिरीक्त पालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. 

दिवाळी नंतरचे 15 दिवस महत्त्वाचे असून या दरम्यान केसेस वाढू शकतात. डिसेंबर हा देखील महत्त्वाचा असून यावेळी परप्रांतीय परत येतील. दिवाळी नंतर लोक परत येतील आणि या केसेस डिसेंबरच्या पहिल्य आठवड्यात समोर येतील. दिवाळी दरम्यान रुग्णालयातील कर्मचार्यांच्या सुट्टीचा निर्णय डिन घेतील जेणेकरून त्यांना कामातून थोडी उसंत मिळेल आणि दिवाळी नंतर ते पुन्हा नव्या जोमाने कामावर रूजू होतील, असा पालिकेने दावा केला आहे. रविवारी मुंबईत 998 नवीन कोरोना रुग्णांची प्रकरण आली. तसेच 865 रुग्ण बरे होऊन घरी गेले. मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90 टक्क्यांच्या घरात असून रुग्ण दुपटीचा दर 241 दिवसांवर गेला आहे. दिवाळी नंतर पालिका आयुक्त इक्बाल चहल परिस्थितीचा आढावा घेतील त्यानंतर नवीन कार्यप्रणाली ठरवली जाईल असं पालिकेच्या अ़धिकार्याने सांगितले.

Decision to close Covid Care Centers after Diwali BMC equipped with the possibility of an increase in the patient

-----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com