esakal | दीपिकाची चौकशी साडेपाच तासानंतर संपली; 'माल' म्हणजे काय? दीपिकाचा NCB समोर खुलासा
sakal

बोलून बातमी शोधा

दीपिकाची चौकशी साडेपाच तासानंतर संपली; 'माल' म्हणजे काय? दीपिकाचा NCB समोर खुलासा

आज पार पडलेल्या साडेपाच तासांच्या चौकशीनंतर NCB ची चौकशी पूर्णपणे संपली आहे असं बोलता येणार नाही.

दीपिकाची चौकशी साडेपाच तासानंतर संपली; 'माल' म्हणजे काय? दीपिकाचा NCB समोर खुलासा

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : सध्याच्या घडीची बॉलिवूडमधील सर्वात मोठी अभिनेत्री दीपिका पदुकोणची चौकशी संपलीय. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमार्फत दीपिकाची चौकशी करण्यात आली. तब्बल पाच ते साडे पाच तास चौकशी केल्यानंतर आता दीपिका पदुकोण NCP कार्यालयातून निघाली आहे. सकाळी माध्यमांना गुंगारा देत ज्या क्रेटा गाडीतून दीपिका पदुकोण चौकशीसाठी आली होती त्याच क्रेटा गाडीतून दीपिका पदुकोण चैकशीनंतर परतली आहे.  सुरवातीला दीपिका पदुकोणकडून जबाब नोंदवण्यात आला. दीपिका आणि करिश्माची म्हणजेच दीपिकाच्या मॅनेजरची समोरासमोर बसून चैकशी करण्यात आली. 

दरम्यान, आज पार पडलेल्या साडेपाच तासांच्या चौकशीनंतर NCB ची चौकशी पूर्णपणे संपली आहे असं बोलता येणार नाही. NCB चे अजूनही काही प्रश्न बाकी असल्याचं बोललं जातंय. गरज पडल्यास दीपिकाला बोलावलं जाणार असल्याचंही समजतंय. 

आजच्या चौकशीमध्ये दीपिकाने सर्वात मोठा खुलासा केलाय, तो म्हणजे त्या WhatsApp ग्रुपचा, Whats App ग्रुपच्या माध्यमातून चॅट झालं होतं. मात्र स्वतः दीपिकाने कधीही ड्रग्सचं सेवन केलं नव्हतं असं स्टेटमेंट दीपिकाने दिलं आहे. सुरवातीला दीपिका काही उडवा उडवीची उत्तरं देत होती, अशीही बातमी समोर आलेली. मात्र  दीपिका आणि करिश्मा प्रकाशची समोरासमोर चौकशी केल्यानंतर दीपिकाने Whats App ग्रुपबद्दल कबुली दिली. चॅटमधील माल बद्दल विचारलं असतात माल म्हणजे एक प्रकारची सिगारेट असल्याचं दीपिकाने सांगितलंय अशी माहिती मिळतेय. 

दरम्यान साडेपाच तासांच्या चौकशीनंतर दीपिका आता तिच्या घरी पोहोचली आहे. दीपिकाने माध्यमांना कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही.  
 

loading image
go to top