दीपिका, श्रद्धा, साराच्या जाहिरातींना 'थांबा', आंतरराष्ट्रीय ब्रॅंड्सची गोची

पूजा विचारे
Tuesday, 29 September 2020

 गेले काही दिवस बॉलिवुडमधील ड्रग्स प्रकरण चांगलंच वळण घेताना दिसत आहे. यात दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुलप्रीत सिंग या बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींची ही नावं आली. प्रकरणात त्यांची चौकशी सुरु असल्यानं तसंच त्याचं यात नाव आल्यानं मोठ्या आंतरराष्ट्रीय ब्रँडसची यात पंचायत झाली आहे.

मुंबईः  गेले काही दिवस बॉलिवुडमधील ड्रग्स प्रकरण चांगलंच वळण घेताना दिसत आहे. यात दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुलप्रीत सिंग या बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींची ही नावं आली.  अनेक जाहिरातदारांनी त्यांना त्यांच्या ब्रँडची जाहिरात करण्यासाठी साईन केले आहे. मात्र आता या प्रकरणात त्यांची चौकशी सुरु असल्यानं तसंच त्याचं यात नाव आल्यानं मोठ्या आंतरराष्ट्रीय ब्रँडसची यात पंचायत झाली आहे. 

श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि दीपिका पादुकोण यांची नावं आल्यामुळे त्यांच्या खांद्यावर असलेल्या ब्रॅंडसना बरंच टेन्शन आलं आहे. सध्या या सर्व अभिनेत्रींची नावं आल्यामुळे यांच्या जाहिराती चालवायच्या की नाही? यावर अनेक मोठे ब्रॅंड विचार करत असल्याची माहिती समोर आली आहे. 

यात 2019 च्या हवाल्यानुसार एकट्या दीपिकावर तब्बल 19 मोठे ब्रॅंड अवलंबून आहेत. दीपिका 22 ते 25 ब्रँड आणि प्रोडक्ट्सच्या जाहिराती करते. आणखीन काही जाहिराती तिने साईन केल्या आहेत.  यात ब्रिटानिया, तनिष्क, एक्सिस बॅंक, ओप्पो, विस्तारा एअरलाईन्स या आणि अशा ब्रॅंडसचा समावेश आहे. आता या सर्वच ब्रॅंडस सध्या टेन्शनमध्ये आहेत. दीपिकावर या ब्रॅंडस मिळून सध्या 600 कोटी रुपये लागलेत. तर श्रद्धा कपूरही अनेक मोठे ब्रॅंड्स बाळगून आहे. सारा अली खान देखील सध्या एका प्रसिध्द ब्रँडची जाहिरात करताना आपल्याला दिसते. सारा श्रद्धा कपूरपेक्षा १५ ते १६ ब्रँडना प्रमोट करते. या प्रकरणात नाव आल्यानं साराला एका प्रसिद्ध ब्रँडनं आपल्या जाहिरातीतून हटवलं आहे. 

श्रद्धा कपूर ही यूथ आयकॉन म्हणून ओळखली जाते. ती वीट, लिप्टन, लॅक्मे, हेअर एंड केअर, व्हॅसलीन आदी अनेक ब्रॅंड आपल्याकडे बाळगून आहे. यात जवळपास तिच्याकडे ३०० कोटीचे ब्रॅंडस असल्याचं कळतं. आता या तीन अभिनेत्रींची नावं यात आली असल्यानं या ब्रॅंड्सनी आपल्या या अभिनेत्रींच्या जाहिराती तूर्तास थांबवायचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ड्रग्स प्रकरणात या अभिनेत्रींची नावे आल्यानंतर जाहिरातदार पुन्हा त्यांना आपल्या पुढच्या जाहिरातीत घेतील का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. जर त्यांना जाहिरातीत घेतले तर त्याचा प्रोडक्ट्सच्या विक्रीवर कसा परिणाम होतो हे पाहणे महत्वाचे ठरेल.

Deepika Padukone Shraddha Kapoor Sara Ali Khan brands advertisement Stop telecast


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deepika Padukone Shraddha Kapoor Sara Ali Khan brands advertisement Stop telecast