esakal | BMC दोन आयुक्तांवरुन कॉंग्रेसमध्येच उभी फूट; रवी राजा म्हणतात 'ती कॉंग्रेसची मागणी नाही'!
sakal

बोलून बातमी शोधा

BMC दोन आयुक्तांवरुन कॉंग्रेसमध्येच उभी फूट; रवी राजा म्हणतात 'ती कॉंग्रेसची मागणी नाही'!

मुंबई उपनगरासाठी महानगर पालिकेचे स्वतंत्र आयुक्त नियुक्त करण्याच्या मागणीवरुन कॉंग्रेस मध्येच दोन गट तयार झाल आहे

BMC दोन आयुक्तांवरुन कॉंग्रेसमध्येच उभी फूट; रवी राजा म्हणतात 'ती कॉंग्रेसची मागणी नाही'!

sakal_logo
By
समीर सुर्वे

मुंबई : मुंबई उपनगरासाठी महानगर पालिकेचे स्वतंत्र आयुक्त नियुक्त करण्याच्या मागणीवरुन कॉंग्रेस मध्येच दोन गट तयार झाल आहे. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी ही मागणी केल्यानंतर पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी दोन आयुक्त नियुक्त करण्याची कॉंग्रेसची मागणी नसल्याचे सांगितले.

मुंबई महानगरला दोन पालकमंत्री दोन जिल्हाधिकारी आहे. त्याच प्रमाणे उपनगरासाठी दोन महापालिका आयुक्तांची गरज आहे.असे मत पालकंमत्री अस्लम शेख यांनी नोंदवले होते.तसेच,यासाठी राज्य सरकारच्या नगरविकास विभागाकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.मात्र,हे शेख यांचे मत आहे.कॉंग्रेसची भुमिका नाही असे पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी सांगितले.

मुंबई, रायगड, ठाणे, पालघर परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

पालिकेच्या नियमा नुसार ,,का आयुक्ताची नियुक्ती करण्यात आली आहे.तर,अतिरीक्त आयुक्त म्हणून चार सनदी अधिकारी आहे.त्यात पुर्व आणि पश्‍चिम उपनगरांची जबाबदारी स्वतंत्र पणे चार पैकी दोन अतिरीक्त आयुक्तांकडे देण्यात आली आहे.पुर्व आणि पश्‍चिम उपनगरातील नागरीकांना मुख्यालयात येणे शक्य नाही.त्यामुळे अतिरीक्त आयुक्तांनी महिन्यातील काही दिवस उपनगरांसाठी स्वतंत्र वेळ देण्याची गरज आहे.असेही त्यांनी नमुद केले

The demand for Mumbai to have two commissioners is not from the Congress said ravi raja

-------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image