
ठाणे - ठाणे महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी पालिका क्षेत्रातील गरीब व गरजू महिलांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहे. यामधील काही योजनांसाठी असलेली उत्पन्नाची अट रद्द करून केशरी व पिवळी शिधापत्रिका ग्राह्य धरावी, जेणेकरून या योजनांचा लाभ जास्तीत जास्त गरजू महिलांना घेता येईल अशी सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांना पत्रान्वये केली आहे.